घरताज्या घडामोडीलाच घेताना ‘एनडीएसटी’च्या दोन व्यवस्थापकांना अटक

लाच घेताना ‘एनडीएसटी’च्या दोन व्यवस्थापकांना अटक

Subscribe

नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांची सर्वात मोठी क्रेडीट सोसायटी असलेल्या नाशिक डिस्ट्रीक्ट सेकेंडरी टिचर्स अ‍ॅण्ड नॉन टिचिंग एम्लाई को-ऑप. सोसायटी(एनडीएसटी)च्या नाशिक कार्यालयात दोन व्यवस्थापकांना बुधवारी (दि.१०) १९ हजार ७१५ रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. शाखा व्यवस्थापक शरद वामन जाधव, व्यवस्थापक जयप्रकाश रघुनाथ कुवर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम काढून देण्यासाठी व नियमित पगार काढून देण्याच्या मोबदल्यात नाशिक डिस्ट्रीक्ट सेकेंडरी टिचर्स अ‍ॅण्ड नॉन टिचिंग एम्लाई को-ऑप. सोसायटी(एनडीएसटी)च्या दोन व्यवस्थापकांनी तक्रारदाराकडे ५ जून रोजी १९ हजार ७१५ रूपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसर पथकाने पडताळणी करून सापळा रचला. एनडीएसटीच्या शाखा व्यवस्थापक, नाशिक कार्यालयात बुधवारी (दि.१०) तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्विकारताना पथकाने दोघांना अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -