घरदेश-विदेशआम्ही फक्त दोनशे होतो तर ते हजार; जवानाने सांगितला प्रत्यक्ष घटनाक्रम!

आम्ही फक्त दोनशे होतो तर ते हजार; जवानाने सांगितला प्रत्यक्ष घटनाक्रम!

Subscribe

लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत जवान सुरेंद्र सिंह हे जखमी झाले होते. त्यांच्यावर लडाख येथील सैनिक हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. जखमी जवान सुरेंद्र सिंह हे तब्बल १२ तासानंतर शुद्धीवर आले. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीचा थरारक अनुभव त्यांनी सांगितला असून हा अनुभव अंगावर शहारे आणणारा आहे. त्यांनी सांगितलेल्या घटनाक्रमामुळे चीनच्या खुरापती उघड झाल्या आहेत. जवान सुरेंद्र सिंह यांनी सांगितले की, चीनी सैनिकांनी धोक्याने गलवान खोऱ्यातून जाणाऱ्या नदीत भारतीय सैनिकांवर अचानकपणे हल्ला चढवला. साधारण ४ ते ५ तासापर्यंत नदीत दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक सुरू होती. त्यावेळी भारतातील जवळपास २०० ते २५० जवान तेथे उपस्थित होते. तर चीनच्या १००० जवानांनी हल्ला केला होता.

चीनने फसवून केला हल्ला 

गलवान खोऱ्यातील बर्फापेक्षाही थंड असलेल्या नदीच्या पाण्यात हा संघर्ष सुरू होता. जवानाने दिलेल्या माहितीनुसार हा संघर्ष सुरू असलेल्या नदीच्या किनाऱ्यावरून केवळ एका व्यक्तीला बाहेर पडण्याइतकी जागा होती. त्यामुळे भारतीय सैनिकांना तिथून बाहेर पडण्यासाठी अडचणी येत होत्या. अन्यथा कमी संख्याबळ असले तरी भारतीय सैनिक त्या चीनी सैनिकांवर भारी पडले असते. चीनने फसवून आणि धोक्याने आमच्यावर हल्ला चढवला. नायतर भारतीय सैनिकांनी चीनच्या सैनिकांना चांगलाच हिसका दाखवला असता, असे जवान सुरेंद्र सिंह म्हणाले.

- Advertisement -

पाच तास नदीमध्ये संघर्ष सुरू 

जवानाने माहिती दिली की, लडाखच्या सैनिक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता सुधारली आहे. या जवानाच्या एका हाताला जबर दुखापत झाली असून डोक्यामध्ये १२ टाके पडले आहेत. ते म्हणाले की, ५ फुट खोल पाण्यात पाच तास चाललेल्या संघर्षामध्ये डोक्याला मार लागल्यामुळे ते जखमी झाले होते. इतर सैनिकांनी त्यांना तिथून बाहेर काढले. त्यावेळी ते शुद्धीवर होते. या झटापटीमध्ये त्यांचा मोबाईल आणि कागदपत्रेही नदीच्या पाण्यात वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले.

जवान सुरेंद्र सिंह हे राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील नौगाव गावातील असून त्यांच्या जखमी होण्याची माहिती समजताच त्यांचे कुटुंबिय चिंतेत आले होते. मात्र हॉस्पिटलमधून नातेवाईकांना फोन केल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला. जवान सुरेंद्र सिंह यांची पत्नी आणि मुलं सूर्य नगरच्या वस्तीत राहत असून त्यांचे आई, वडिल आणि भाऊ हे गावी राहतात.

- Advertisement -

हेही वाचा –

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गणेशोत्सव साधेपणाने साजरे करू – मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -