घरक्रीडाचीनी कंपन्यांवर बहिष्कार, मग IPL कसं होणार? BCCI ऐकेना!

चीनी कंपन्यांवर बहिष्कार, मग IPL कसं होणार? BCCI ऐकेना!

Subscribe

VIVO कंपनी आणि बीसीसीआय यांच्यात ५ वर्षांचा करार झाला असून तो २०२२ मध्ये संपणार

लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री चीनसोबत झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान हुतात्मा झाले होते. तसेच गलवान व्हॅलीत भारत आणि चिनी सैन्यामध्ये सुरु असलेल्या तणावाच्या वातावरणामुळे सध्या संपूर्ण देशभरात चीनविरोधी वातावरण असून चीनच्या उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. याचा परिणाम आयपीएलवर देखील होण्याची शक्यता आहे.

VIVO ची स्पॉन्सरशीप रद्द करणार?

सध्या बीसीसीआय आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र IPL या स्पर्धेला स्पॉन्सरशीपही VIVO ह्या चिनी कंपनीची आहे. देशातले सध्याचे वातावरण पाहता, बीसीसीायनेही याप्रकरणी सावध भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बीसीसीआय या कंपनीचे स्पॉन्सरशीप रद्द करणार का, असा सवाल उठत आहे. पण यावर बीसीसीआयचे बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

- Advertisement -

VIVO आणि बीसीसीआयमध्ये ५ वर्षांचा करार

यावेळी ते असे म्हणाले की, पुढील वर्षासाठी बीसीसीआय आपले स्पॉन्सरशीप संदर्भातल्या धोरणावर विचार करु शकते, परंतू यंदा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. तर VIVO कंपनी आणि बीसीसीआय यांच्यात ५ वर्षांचा करार झाला असून तो २०२२ मध्ये संपणार आहे. प्रत्येक वर्षासाठी बीसीसीआयला VIVO कंपनीकडून ४४० कोटी रुपये मिळतात. मिळणारा पैसा चिनी कंपनीकडून येत असला तरीही तो भारतीय अर्थव्यवस्थेच्या कामाला येत आहे, असे देखील त्यांनी सांगितले.

स्पॉन्सरशीपच्या पैशांसाठी बीसीसीआय कर भरतंय

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना त्यांनी असे सांगितले की, “जेव्हा तुम्ही भावनिक होऊन विचार करता त्यावेळी तर्क आणि विचार मागे पडतात. चिनी कंपनीला पाठींबा देणे आणि भारतीय स्पर्धेसाठी त्यांची मदत घेणे या गोष्टींमधला फरक आपल्याला समजवून घ्यावा लागेल. चिनी कंपनी भारतात आपले जे काही उत्पादन विकते. त्यामधून मिळणाऱ्या पैशाचा काही भाग ही कंपनी बीसीसीआयला स्पॉन्सरशीपच्या स्वरुपात देते. या स्पॉन्सरशीपच्या पैशांसाठी बीसीसीआय नित्यनियमाने कर भरत आहे. त्यामुळे एका अर्थाने हा पैसा भारताच्याच कामी येत आहे.”

- Advertisement -

चिनी कंपन्यांना मदत करत नाही तर…

तसेच, मी वैयक्तिक रित्या चिनी मालावर बहिष्कार घालण्याच्या समर्थनार्थ आहे. ज्या-ज्या ठिकाणी सरकारला आमची गरज आहे तिकडे आम्ही सरकारसोबत आहोत. बीसीसीआय भारतीय कंपन्यांनाही तितकाच पाठींबा देत. काही वर्षांपूर्वी Oppo या कंपनीसोबतचा करार संपल्यानंतर Byju’s या भारतीय कंपनीकडे भारतीय संघाच्या स्पॉन्सरशीपचे हक्क देण्यात आले आहेत. बीसीसीआय कोणत्याही पद्धतीने चिनी कंपन्यांना मदत करत नसून, भारतीय क्रिकेटसाठी त्यांच्या पैशाचा वापर करत असल्याचं धुमाळ यांनी सांगितले.


भारताने जिंकलेली २०११ ची वर्ल्डकप फायनल फिक्स्ड होती, श्रीलंकन माजी मंत्र्याचा दावा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -