घरमनोरंजनTrailerOut: भिखू म्हात्रेनंतर मनोज वाजपेयीचा 'भोसले'मध्ये मराठमोळा अंदाज!

TrailerOut: भिखू म्हात्रेनंतर मनोज वाजपेयीचा ‘भोसले’मध्ये मराठमोळा अंदाज!

Subscribe

गेल्या महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या मिसेस सिरीअर किलरमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ पाडणाऱ्या अभिनेता मनोज वाजपायी यांचा आणखी एक चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. सत्या चित्रपटातून भिखू म्हात्रेची भूमिका साकारणाऱ्या मनोज वाजपेयी यांनी पुन्हा एकदा मराठमोळ्या व्यक्तीची व्यक्तिरेखा आपल्या आगामी चित्रपटात साकारली आहे. त्यांच्या भोसले चित्रपटाचे ट्रेलर आज प्रदर्शित झाले असून पुन्हा एकदा मनोज वाजपेयी यांनी वेगळी भूमिका भोसलेच्या निमित्ताने त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. मराठी अभिनेता संतोष जुवेकरदेखील चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. हा चित्रपट सोनी लिव्ह अॅपवर २६ जून रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

- Advertisement -

अभिनेता संतोष जुवेकरची हटके भूमिका 

अभिनेता संतोष जुवेकर यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचे ट्रेलर लाँच केले असून आपण या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी उत्साही असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच भोसले चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठी माणसाचा मुद्दा रुपेरी पडद्यावर आणला आहे. मनोज वाजपायी यांचा करारी चेहरा, गंभीर भाव आणि धोतर-गांधी टोपीचा पेहराव त्यांना मराठी माणूस दाखवण्यासाठी पुरेसा ठरत आहे. ट्रेलरमध्ये संतोष जुवेकर आणि मनोज वाजपायी यांच्या संवादाची झलक दाखवण्यात आली असून नेटिझन्सनेही या ट्रेलरला पसंती दर्शवली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

मुंबईच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -