घरताज्या घडामोडीरूग्णसंख्येत नाशिक शहर हजारी पार

रूग्णसंख्येत नाशिक शहर हजारी पार

Subscribe

नाशिक शहरात करोनाने धुमाकूळ घातला असून, शुक्रवारी (दि.१९) दिवसभरात ३९ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यात नाशिक शहर ३५, नाशिक ग्रामीण ४ रूग्णांचा समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात ६ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक शहर ३ आणि नाशिक ग्रामीणमधील ३ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ४६१ करोनाबाधित रूग्ण असून एकट्या नाशिक शहरात 1 हजार 12 रूग्ण आहेत.

जिल्हा प्रशासनास शुक्रवारी दोन टप्प्यात अहवाल प्राप्त झाले. पहिल्या टप्प्यात नाशिक शहरात १९ नवे रूग्ण आढळून आले. दुसर्‍या टप्प्यात सायंकाळी ७.३५ वाजता २० नवे रूग्ण आढळून आले. यात नाशिक शहरात १६, येवला आणि टाकेद येथील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. जिल्ह्यात २ हजार ४६१ करोनाबाधित रूग्णांपैकी १ हजार ५२० रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण २७२, नाशिक शहर ४२०, मालेगाव ७७१, जिल्ह्याबाहेरील ५७ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या ७८८ रूग्णांवर उपचार सुरू आहे. यात नाशिक ग्रामीण १८७, नाशिक शहर ५२५, मालेगाव ६५, जिल्ह्या बाहेरील ११ रूग्णांचा समावेश आहेत. शुक्रवारअखेर जिल्ह्यातील ४५२ संशयित रूग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. यात नाशिक ग्रामीण १६३, नाशिक शहर १८६, मालेगाव १०३ रूग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी दिवसभरात करोनासदृश्य लक्षणे आढळून आलेले २६८ संशयित रूग्ण विविध रूग्णालयांमध्ये दाखल झाले. यात डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय २, मालेगाव रूग्णालय ५, नाशिक ग्रामीण रूग्णालय १२८, जिल्हा रूग्णालय १४, नाशिक महापालिका रूग्णालयात ११९ रूग्ण दाखल झाले.

- Advertisement -

शहरात तिघांचा मृत्यू
नाशिक शहरात शुक्रवारी दिवसभरात मृत तीन रूग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले. खिस्तीया कॉलनी,वडाळा रोड, नाशिक येथील ६२ वर्षीय पुरुषाचा बुधवारी (दि.१७) उपचार सुरू असताना मृत्यू झाला. वडाळा रोड येथील ३८ वर्षीय पुरुष व ६० वर्षीय वृद्धाचा गुरुवारी (दि.१८) रोजी मृत्यू झाला. प्रशासनास शुक्रवारी तिघेजण करोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केले असून स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहे.

शहरातील रूग्ण असे…
रामवाडी १, अंबड १, त्रिमुर्ती चौक, सिडको १, इंदिरानगर ३, नाशिक १, श्रमिकनगर १, जुने नाशिक १, सारडा सर्कल १, गंजमाळ १, दूधबाजार १, मेरी कॉलनी १, काठे गल्ली १, हनुमानवाडी १, काझीपुरा १, टाकेद २, येवला २,

- Advertisement -

नाशिक करोना अहवाल
पॉझिटिव्ह रूग्ण-२४६१ (मृत-१५३)
नाशिक ग्रामीण-४८२ (मृत-२३)
नाशिक शहर-1012 (मृत-५१)
मालेगाव-९०५ (मृत-६९)
अन्य-७८(मृत-१०)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -