घरदेश-विदेशचीनला उत्तर देण्यास तयार राहा, संरक्षणमंत्र्यांचा तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना आदेश

चीनला उत्तर देण्यास तयार राहा, संरक्षणमंत्र्यांचा तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना आदेश

Subscribe

तिन्ही दलाच्या प्रमुखांना नियंत्रण रेषेजवळ हवाई तसंच समुद्र मार्गावर चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे आदेश

पूर्व लडाखमधील चकमकीनंतर भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. वास्तविक नियंत्रण रेषेवरील चीनशी सुरू असलेल्या वादावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तीन सैन्य प्रमुख आणि सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासमवेत मोठी बैठक घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत लडाखच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी चीनच्या कोणत्याही कारवाईला उत्तर देण्यासाठी सैन्यास पूर्ण तयारी करण्यास सांगितलं आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची बिपीन रावत यांच्यासह तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी रविवारी भेट घेतली. राजनाथ सिंग सोमवारी रशिया दौऱ्यासाठी जाणार असून त्याआधी ही भेट घेण्यात आली आहे. यावेळी राजनाथ सिंग यांना लडाखमधील परिस्थितीची माहिती देण्यात आली. याशिवाय तिन्ही दलाच्या प्रमुखांना नियंत्रण रेषेजवळ हवाई तसंच समुद्र मार्गावर चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -


हेही वाचा – नरेंद्र मोदी नव्हे, हे तर सरेंडर मोदी; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

- Advertisement -

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग सोमवारी तीन दिवसांच्या रशिया दौर्‍यावर रवाना होतील. यावेळी, दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवरील सोव्हिएत विजयाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त संरक्षण मंत्री मॉस्को येथे लष्करी परेडमध्ये उपस्थित राहतील. परेड ९ मे रोजी होणार होती, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचा रशियाचा दौरा निर्णायक असल्याचं बोललं जात आहे. पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैन्यांबरोबर झालेल्या हिंसक चकमकीत कर्नलसह २० सैनिक शहीद झाले. त्याचबरोबर या चकमकीत चीनचंही मोठं नुकसान झालं आहे. चीनच्या सैन्य युनिटच्या कमांडिंग ऑफिसरसह ४० सैनिकांना भारतीय जवानांनी ठार केलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -