घरदेश-विदेशनरेंद्र मोदी नव्हे, हे तर सरेंडर मोदी; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

नरेंद्र मोदी नव्हे, हे तर सरेंडर मोदी; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Subscribe

भारत-चीन सैनिकांमध्ये पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. गेले काही दिवस राहुल गांधी भारत-चीन वादावर केंद्र सरकारला प्रश्न विचारत आहेत. आजही राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “नरेंद्र मोदी हे वास्तवात सरेंडर मोदी आहेत,” असं ट्विट करत मोदींवर टिकास्त्र सोडलं आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी शनिवारीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. चीनच्या आक्रमणापुढे पंतप्रधानांनी भारतीय भूमी सरेंडर केली, असं ट्विट करत मोदींवर हल्ला चढवला होता. शिवाय त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले होते. “जर ती जमीन चीनची होती तर, भारतीय जवान का शहीद झाले? आणि ते कोठे शहीद झाले?” असे सवाल देखील उपस्थित केले होते.

- Advertisement -

हेही वाचा – ट्रम्पसाठी चीनला दुखवून काय साध्य केले? राऊत यांचा मोदींना सवाल!


भाजपचं प्रत्युत्तर

राहुल गांधींच्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी राहुल गांधी यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं आहे. “काँग्रेस नेते ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींचा अपमान करत आहेत, तो केवळ मोदींचा अपमान नसून देशातील नागरिकांचा अपमान आहे. राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ज्या अपमानास्पद शब्दांचा वापर करत आहेत, तसा वापर शत्रू राष्ट्रातील नेतेही करत नाहीत. राहुल गांधी सातत्यानं पंतप्रधान आणि देशाचा अपमान करत आहेत,” असं शाहनवाज यांनी म्हटलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -