घरताज्या घडामोडीभारत-चिनी सैनिक पुन्हा एकदा 'आमने-सामने'

भारत-चिनी सैनिक पुन्हा एकदा ‘आमने-सामने’

Subscribe

भारत-चीन या दोन्ही देशांच्या चर्चेदरम्यान चीनने सीमेवरून आपले सैन्य मागे घेण्याचा दावा केला होता. पण आता चीन सीमेवरील आपल्या सैन्यात वाढत करताना दिसत आहे.

लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलवर वाढत्या तणावाच्या दरम्यान चीनने आपले अधिक सैन्य तैनात केले आहेत. चीनकडून दोन डिव्हिजन भारतीय सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. यालाच उत्तर म्हणून भारताने देखील अधिक सैन्य तैनात केले आहेत. यादरम्यान भारतीय सैन्याला असे वाटते की, दोन्ही देशांमधील तणावर ऑक्टोबरपर्यंत कायम राहील.

माहितीनुसार चीनच्या तिबेट आणि शिंच्यांग प्रांतात १० हजार तैनात असलेले सैन्य गेल्या काही दिवसांपासून युद्ध अभ्यास करत आहेत. एलएसीवरील चीनच्या प्रत्येक हालचालींवर भारतीय सुरक्षा एजेंसी लक्ष ठेवून आहे. आजतक या वृत्तवाहिनीशी बोलताना सरकारच्या सुत्रांनी एलएसीवर चीनकडून अतिरिक्त सैन्य तैनात केले असल्याचे सांगितले.

- Advertisement -

तसेच गलवान खोऱ्यात, पेट्रोलिंग पॉईंट-१५, पांगोंग त्सो आणि फिंगर क्षेत्रात भारताने अधिक सैन्य तैनात केले आहेत. चीनसोबतच्या संघर्षासाठी एक ब्रिगेट इतके सैन्य तैनात करण्यात आले आहे. यासोबत भारतीय सैन्याने रणनीती पॉईंटवर तैनात वाढ केली असून टॅंकर-हत्यारे पोहोचवत आहेत.

सरकारच्या अधिकृत सूत्रांनी म्हटले की, चीनने सीमेवर २० हजार सैन्य तैनात केले आहेत. यासह चीनने उत्तर शिंच्यांग प्रांतामध्ये आपले अतिरिक्त डिव्हिजन पण एलएसीवर आणण्याचा निर्णयही घेतला आहे. चिनी सैन्याचे अतिरिक्त डिव्हिजन ४८ तासांमध्ये भारतीय पोजिशनवर पोहोचू शकते.

- Advertisement -

तसेच सरकारच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, आम्ही चीनमधील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवत आहोत. एलएसीवर चिनी सैन्याच्या वाढत्या तैनातीमुळे चीन काहीतरी करणार असल्याची शंका उपस्थित होत आहे. चर्चेदरम्यान चीनने सैन्य मागे घेण्याचा दावा केला होता पण चीनने सीमेवर आपल्या सैन्यात वाढ करत आहे.

एलएसीवर चीनच्या सैन्य तैनात वाढल्यानंतर भारतानेही सीमेवर सैन्यात वाढ केली आहे. भारतीय सैन्याचे दोन अतिरिक्त डिव्हिजन एलएसीच्या जवळ तैनात केले आहेत. कारण चीनच्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. यासह भारतीय जवानांना संसाधने देण्यात येत आहेत, जेणेकरून ते हवामानानुसार आपले रक्षण करू शकतील.

सूत्रांचे म्हणणे आहे की, चीनच्या वाढत्या तैनातीनंतर भारतीय लष्कराने लडाखमध्ये अतिरिक्त टँक आणि सशस्त्र रेजिमेंट तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर मिळाले पाहिजे. टँक आणि हत्यारे फ्रंट लाईनवर पोहोचवले जात आहेत, जिथे भारतीय सैनिक चिनी सैन्याच्या समोरासमोर उभे आहेत.


हेही वाचा – जम्मू-कश्मीर: CRPF च्या गस्तीवर दहशतवादी हल्ला; ४ जवानांसह १ नागरिक ठार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -