घरताज्या घडामोडीCoronavirus: युपीमध्ये उद्या रात्री १० वाजल्यापासून लॉकडाऊन जारी

Coronavirus: युपीमध्ये उद्या रात्री १० वाजल्यापासून लॉकडाऊन जारी

Subscribe

या लॉकडाऊन दरम्यान रुग्णालये आणि आवश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील.

उत्तर प्रदेशात वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये शुक्रवार रात्री १० वाजल्यापासून ते १३ जुलै पहाटे ५ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या लॉकडाऊन दरम्यान रुग्णालये आणि आवश्यक वस्तूंची दुकाने सुरू असणार आहेत.

- Advertisement -

उत्तर प्रदेशमधील वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्य सचिव राजेंद्र तिवारी यांनी लॉकडाऊनचे जारी करणाचा आदेश दिला आहे. या लॉकडाऊन वेळी सर्व शहरी आणि ग्रामीण भागातील बाजारपेठ, कार्यालये वगैरे बंद राहतील. तथापि या दरम्यान आवश्यक सेवांवर कोणतेही बंधन घालण्यात येणार नाहीत.

या लॉकडाऊनला उद्या रात्री १० वाजता सुरुवात होणार असून १३ जुलै पहाटे ५ वाजेपर्यंत असणार आहे. लॉकडाऊन दरम्यान मालवाहतुकीवर कोणतेही बंधन नाही आहे. राष्ट्रीय आणि राज्य मार्गांवर वाहनांची हालचाल सुरुच राहणार आहे. पूर्वीप्रमाणे रेल्वेची देखील वाहतूक सुरुच राहणार आहे.

- Advertisement -

सरकारच्या आदेशानुसार, ११ ते १२ जुलै दरम्यान सफाई आणि स्वच्छता तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतेही बंधन घालण्यात येणार नाही. तसेच या लॉकडाऊनच्या कालवधीत एक्सप्रेसवे, मोठे पूल आणि रस्त्यांशी संबंधित सर्व बांधकामे सुरू राहतील.


हेही वाचा – ICSE बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल उद्या ‘या’ संकेतस्थळावर कळणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -