घरCORONA UPDATEसावधान! लिफ्टनं जाणं पडलं महागात; एका महिलेनं ७१ जणांना केले कोरोना संक्रमित!

सावधान! लिफ्टनं जाणं पडलं महागात; एका महिलेनं ७१ जणांना केले कोरोना संक्रमित!

Subscribe

कोरोना पसरण्यासाठी कारणीभूत ठरली एक लिफ्ट

जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून सध्या बहुतेक रुग्णांमध्ये कोरोना कोरोनाची लक्षणं दिसत नसल्याचे ही अनेक प्रकरणं समोर आले आहेत. सर्दी, खोकला, ताप असल्यास तसेच शिंकताना-खोकताना तोंडावाटे निघणाऱ्या थेंबांच्या संपर्कात आल्यास कोरोना पसरतो, त्यामुळे सतत हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा असे सांगितले जात आहे. मात्र चीनमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता अधिक वाढली आहे.

असा घडला प्रकार

कोरोनाची कोणतीही लक्षणं नसताना, सुरुवातीला कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आलेली असताना आणि पूर्ण खबरदारी घेऊनदेखील एका महिलेनं तिच्या नकळत एक-दोन नव्हे तर तब्बल ७१ जणांना कोरोना संक्रमित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेने लिफ्टचा वापर केला होता. त्याच ठिकाणी या ७१ जणांचा स्पर्श झाल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

कोरोना पसरण्यासाठी कारणीभूत ठरली लिफ्ट

मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने या प्रकरणाचा अभ्यास केला. १९ मार्चला ही महिला अमेरिकेहून चीनच्या हेलोंगजिआंगमध्ये परतली. तिची कोरोना टेस्ट करण्यात आली मात्र ती नेगेटिव्ह आली. तरी देखील या महिलेनं खबरदारी म्हणून स्वत:ला घरात क्वारंटाइन केलं. विशेष म्हणजे जेव्हा ती आपल्या घरी परतली तेव्हा देखील ती लिफ्टमध्ये एकटीच गेली. तिच्यासह दुसरं कुणीच नव्हतं. मात्र तिनं लिफ्ट वापरल्यानंतर थोड्यावेळाने तिच्या शेजाऱ्यांनी लिफ्टचा वापर केला आणि हीच लिफ्ट कोरोना पसरण्यासाठी कारणीभूत ठरली असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला.

अशी झाली ७१ जणांना कोरोनाची लागण

न्यूज १८ ने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेहून परतलेल्या महिलेनं बिल्डिंगमधील लिफ्टचा वापर केला, त्यावेळी ती एकटीच होती. ज्या लिफ्टमधून ती महिला गेली त्याच लिफ्टमधून थोड्या वेळाने तिच्या शेजारी राहणारी व्यक्ती गेली, महिला आणि तिच्या शेजारी राहणारी व्यक्ती थेट एकमेकांच्या संपर्कात आली नव्हती.

- Advertisement -

यानंतर ज्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने त्या लिफ्टचा वापर केला, तिला भेटण्यासाठी तिची आई आणि तिचा बॉयफ्रेंड आला, जे दोघंही नंतर एका पार्टीत गेले. पार्टीतील एका व्यक्तीला काही दिवसांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याची दोन्ही मुलंही रुग्णालयात त्याची देखभाल करत होते. नंतर या व्यक्तीला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अमेरिकेहून परतलेल्या महिलेच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या आईच्या बॉयफ्रेंडमध्येही कोरोनाची लक्षणं दिसू लागली. अमेरिकेहून परतलेल्या त्या महिलेची पुन्हा चाचणी करण्यात आली. सुरुवातीला या महिलेची टेस्ट नेगेटिव्ह होती मात्र अँटिबॉडी टेस्टमध्ये ती पॉझिटिव्ह होती. यापुर्वी तिला आधी कोरोना झाला होता. मात्र तिच्यामध्ये कोणतीही लक्षणं नव्हती. लक्षणं न दिसणाऱ्या या कोरोना संक्रमित महिलेकडून लिफ्टच्या माध्यमातून तिच्या शेजाऱ्यांपर्यंत हा कोरोना पोहोचला आणि तो त्यांच्या माध्यमातून पसरत जाऊन त्यांची लागण तब्बल ७१ जणांना झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


आईच्या गर्भातच बाळाला संसर्ग; जन्म झाल्यावर बाळ निघालं पॉझिटिव्ह!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -