घरफिचर्सतुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे का? असा लावा शोध

तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे का? असा लावा शोध

Subscribe

तुमचं आधारकार्ड तुमच्या नकळत अन्य कुणी वापरलं आहे का? आणि वापरलं असेल तर ते कुठे कुठे वापरलं गेलं आहे हे तुम्हाला माहित असायला हवं.

आज आपल्या देशात ९० टक्क्यांहून अधिक लोकांकडे आधारकार्ड आहे. आजकाल कुठल्याही सरकारी किंवा खासहगी क्षेत्रातील व्यवहारांमध्ये आधारकार्डाचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मोबाईलचं सिमकार्ड घेण्यापासून ते बँक अकाउंट उघडण्यापर्यंत आधार कार्डचा वापर केला जातो. अशात तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होणं काही कठीण नाही. त्यामुळे तुमच्या नकळत जर कुणी तुमचं आधार कार्ड अयोग्य कामांसाठी वापरलं असेल, तर ते कुठे कुठे वापरलं गेलं आहे याची माहिती तुम्हाला असली पाहिजे. तुमच्यासोबत असा प्रकार घडल्यास तुम्ही आधार कार्डची बायोमॅट्रिक माहिती ब्लॉक किंवा अनब्लॉक करु शकता. जाणून घ्या याविषयीची अधिक माहिती.

स्टेप 1: आधार कार्डचा वापर कुठे झाला आहे याचा शोध लावण्यासाठी, सर्वप्रथम यूआईडीएआय (UIDAI) च्या uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.

- Advertisement -

स्टेप 2: वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला आधार सर्विस टॅब वर क्लिक करावं लागेल.

स्टेप 3: या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डची ऑथेंटिकेशन हिस्ट्री दिसेल.

- Advertisement -

स्टेप 4: याठिकाणी तुम्हाला तुमचा १२ अंकी आधार नंबर रजिस्टर करायचा आहे. त्यानंतर वन टाईम पासवर्ड (OTP) सोबत आलेला सिक्युरिटी कोड तिथे द्यायचा आहे.

स्टेप 5: त्यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेशन हिस्ट्रीचे अनेक पर्या दिसतील. जसे की – बॉयोमॅट्रिक्स, डेमोग्राफिक्स, ओटीपी, डेमोग्राफिक आणि बॉयोमॅट्रिक, बॉयोमॅट्रिक आणि ओटीपी तसंच डेमोग्राफिक आणि ओटीपी. यापैकी कोणताही एक ऑप्शन तुम्ही निवडू शकता किंवा सर्वच ऑप्शन्सही निवडू शकता.

स्टेप 6: त्यांनतर तुम्हाला आधार कार्डच्या वापराचे कुठल्या तारखेपासून ते कुठपर्यंत डिटेल्स हवे आहेत, ते निवडावं लागेल.

स्टेप 7: त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या मोबाईलवर आलेला OTP तिथे टाकून Submit बटणावर क्लिक करायचं आहे.

स्टेप 8: त्यानंतर तुम्ही निवडलेल्या कालावधी दरम्यान तुमचं आधारकार्ड कुठे कुठे वापरलं गेलं आहे, याचा माहिती तुम्हाला मिळेल.

आधार कार्डची बायोमॅट्रिक माहिती ‘लॉक – अनलॉक’ करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

स्टेप 1: आधार कार्डची बयोमॅट्रिक माहिती शोधून काढण्यासाठी resident.uidai.gov.in/biometric-lock या लिंकवर जा.

स्टेप 2: तिथे गेल्यावर तुमचा १२ अंकी आधार नंबर रजिस्टर करा आणि त्यानंतर वन टाईम पासवर्ड (OTP) सोबत आलेला सिक्युरिटी कोड तिथे द्या.

स्टेप 3: मोबाईलवर आलेला OTP नंबर टाकल्यानंतर तुम्ही तुमचं आधार कार्ड लॉक करु शकता. शिवाय तिथूनच तुम्ही तुमचं कार्ड अनलॉकही करु शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -