घरताज्या घडामोडीMumbai Building Collapse Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी दाखल; दुर्घटनेत दोन...

Mumbai Building Collapse Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी दाखल; दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू

Subscribe

मालाड मालवणी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर झाली आहे. अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.


भानुशाली बिल्डिंग, सी. पी. ओ. ऑफीसच्या समोर, कबुतरखाना, मुंबई या ठिकाणी असलेल्या जुन्या बिल्डिंगचा काही भाग कोसळला. या घटनेत महिला कुसुम प्रदूमलाल गुप्ता (वय ४५) आणि जोखना मेवालाल गुप्ता (वय ७०) यांचा मृत्यू झाला आहे. तसेच भालचंद्र रामभगन कांडू (वय ४८), शैलेश भालचंद्र कांडू (वय १७) तसेच नेहा प्रदूमलाल गुप्ता (वय २१) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जे. जे. हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशामक दल, एनडीआरएफ दल, तसेच मुंबई पोलीस चे कर्मचारी व अधिकारी यांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.

- Advertisement -

ढिगाऱ्याखालून आतापर्यंत १३ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आले आहे. दुर्घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

घाटकोपरमधील साकिनाका परिसरात आणखी एक दरड कोसळण्याची घटना घडली आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जीपीओच्या समोर दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ठिकाणी भेट देऊन चालू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला आणि दुर्घटनेच्या स्थळाची पाहणी केली.


घटनास्थळी एनडीआरएफचे पथक, अग्निशमन दलाचे जवान बचावकार्य करत आहेत. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ६ जणांना बाहेर काढण्यात आले असून या दुर्घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकण्याची शक्यता असून त्याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली.


इमारतीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला.


फोर्ट येथील भानुशाली इमारत कोसळली असून या घरटास्थळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड दाखल झाले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे.


दरम्यान, मालाड मालवणी येथेदेखील आज दुपारी नुरी मशीदजवळ तळमजला अधिक दुमजली घर कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत दोनजण ठार झाले आहेत. या दुर्घटनेत १३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करून सोडण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)


शिवसेना खासदार अरविंद सावंत घटनास्थळी दाखल. या इमारतीच्या डाकडुजीचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली होती, असे अरविंद सावंत यांनी यावेळी सांगितले.


गुरुवारी दुपारी मालवणमध्ये एक तीन मजल्यांची चाळ कोसळल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास मुंबईच्या फोर्ट परिसरातल्या मिंट रोडवरच्या एका इमारतीचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली असून अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. तळमजल्यावर ५ मजल्यांचं बांधकाम असलेल्या या इमारतीला एका बाजूला टेकू लावल्याची धक्कादायक बाब देखील समोर येत आहे. दरम्यान, घटनास्थळी रुग्णवाहिका देखील दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, महापालिका मुख्यालयाच्या समोरच ही इमारत असल्यामुळे त्यावर कारवाई का करण्यात आली नाही? असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे.

मुंबईतील सीएसटी स्थानकाजवळ असलेल्या जीपीओ समोरील इमारत कोसळली

मुंबईच्या प्रसिद्ध अशा सीएसटी स्थानकाजवळ असलेल्या मुख्य पोस्ट ऑफिस (GPO) समोरील एक जुनी इमारत मुसळधार पावसामुळे कोसळली…

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, July 16, 2020

संध्याकाळी ५ च्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. भानुशाली असं या इमारतीचं नाव असल्याचं समजत असून इमारतीचा अर्धा भाग कोसळल्याची देखील माहिती मिळत आहे. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अनेकजण घरातच होते. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असल्याची भिती व्यक्त केली जात असून अग्निशमन दल आणि बचाव पथकाने बचावकार्य सुरू केलं आहे. दरम्यान, इमारतीचा ४० टक्के भाग कोसळला असून उरलेला भाग अजूनही उभा आहे. मात्र, अर्धी इमारत कोसळल्यामुळे उर्वरीत भाग देखील कोसळण्याची गंभीर शक्यता वर्तवली जात आहे. या इमारतीचा डागडुगीचं काम सुरू होतं आणि तेव्हाच ती नेमकी कोसळली, अशी माहिती शिवसेना नेते अरविंत सावंत यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -