घरताज्या घडामोडीPanvel Rape Case : 'चौकात फाशी द्या', बलात्काऱ्याविरोधात मनसे आक्रमक!

Panvel Rape Case : ‘चौकात फाशी द्या’, बलात्काऱ्याविरोधात मनसे आक्रमक!

Subscribe

पनवेलमध्ये एका क्वारंटाईन सेंटरमध्ये ४० वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध केला जात असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया आली आहे. मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्वीट करून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘पनवेलमध्ये क्वारंटाईन सेंटरमधील महिला रुग्णावर एका पुरुषाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे महिला कुठेही सुरक्षित नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. अशा लिंगपिसाट बलात्काऱ्याला कोणतेही वैद्यकीय उपचार मिळू नयेत, ही पहिली शिक्षा. त्यातूनही तो वाचलाच, तर चौकात फाशी ही अंतिम शिक्षा द्यावी. बलात्कार रोखण्यासाठी कठोर शिक्षेच्या धाकाला दुसरा पर्याय नाही’, असं लिहिलेला एक फोटो त्यांनी ट्वीट केला आहे.

- Advertisement -

डॉक्टर असल्याचं सांगून केला बलात्कार

पनवेलमध्ये कोरोना रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये एक ४० वर्षीय महिला उपचार घेत होती. तिच्या बाजूच्याच खोलीमध्ये दाखल असलेल्या रुग्णाला रोज जेवण देण्यासाठी आरोपी येत होता. हळूहळू त्याने या महिलेशी देखील ओळख वाढवली. नंतर त्याला स्वत:ला देखील लक्षणं जाणवू लागल्यानंतर त्याच सेंटरमध्ये त्याला दाखल करण्यात आलं. यादरम्यान हा आरोपी महिलेच्या खोलीत गेला आणि आपण डॉक्टर असल्याचं सांगून तपासणीच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेवर देखील टीका होत असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -