घरताज्या घडामोडीपिंपरी-चिंचवड : जुलैअखेर बाधितांची संख्या २४ हजार होईल, आयुक्तांचा अंदाज

पिंपरी-चिंचवड : जुलैअखेर बाधितांची संख्या २४ हजार होईल, आयुक्तांचा अंदाज

Subscribe

जुलै अखेरपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २४ हजार होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुण्याभोवतीचा कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना आता पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊन करुन देखील कोरोना विषाणूची परिस्थिती जैसे थै असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती कशी आटोक्यात आणायची हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर ‘आ’वासून उभा आहे. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी धक्कादायक अंदाज वर्तवला आहे. जुलै अखेरपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २४ हजार होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

काय म्हणाले आयुक्त?

‘रुग्ण वाढीचे कारण कोरोनाचा फैलाव नाही आहे तर मोठ्या संशयित व्यक्तींच्या चाचणीच्या संख्येत वाढ केल्याने हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे, असे आयुक्तांनी स्पस्ट केले आहे. याशिवाय सध्या उपचार घेत असलेल्या सुमारे दहा हजार रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षण नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले आहे. अखेरपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल २४ हजार असेल’, असा अंदाज आयुक्तांनी वर्तवला आहे.

- Advertisement -

संशयित व्यक्तींच्या चाचणीत वाढ

रुग्ण वाढीचे कारण कोरोनाचा फैलाव नाही आहे तर मोठ्या संशयित व्यक्तींच्या चाचणीच्या संख्येत वाढ केल्याने हा आकडा दिवसेंदिव वाढत आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय सध्या उपचार घेत असलेल्या सुमारे १० हजार रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षण नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – ‘दिशा कायदा’ ही केवळ घोषणाचं होती का? चित्रा वाघ यांचा सवाल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -