घरमुंबईकधीही ढासळू शकते Fort मधील 'ही' इमारत; भीतीपोटी रहिवासी पडले बाहेर

कधीही ढासळू शकते Fort मधील ‘ही’ इमारत; भीतीपोटी रहिवासी पडले बाहेर

Subscribe

छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील फोर्ट परिसरातील भानूशाली इमारत पडून आठवडा होत नाही, तोच याच इमारतीच्या लगत असलेली धनराज मेंशन इमारत पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही इमारत पूर्णपणे खाली करण्यात आली आहे. तरी या घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. जीपीओ समोरील मिंट रोड वरील धनराज मेंशन नावाची इमारत असून ही जुनी इमारत आहे. याच इमारतीच्या लगत दांगट न्यूज पेपर एजन्सीचे कार्यालय देखील आहे. इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरील बाहेरील बाजू कडील भिंतीचे सिमेंट आणि माती पडत असल्याचे एका रहिवाशांचे लक्षात आले. गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार लक्षात आल्यानंतर तात्काळ रहिवाशांनी आरडाओरड केल्याने व आजूबाजूच्या नागरिकांनी एकत्र येत रहिवाशांनी इमारत खाली केली.

धनराज मेंशन इमारत

कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी त्यांनी तात्काळ इमारत खाली केली असून त्यांनी आपल्या नातेवाईकांकडे आसरा घेतला आहे. तर आम्हाला तात्काळ दुसरीकडे घरे द्यावीत, अशी त्यांनी मागणी केली आहे. त्यानंतर घटनास्थळी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. सध्या इमारतीच्या आजूबाजूचा परिसर आणि रस्ता संपूर्णपणे बंद करण्यात आला असून इमारत कधीही ढासळू शकते. त्यामुळे इमारतीच्या कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी हे याठिकाणी एमआरए मार्गावर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.

- Advertisement -
धनराज मेंशन इमारत

दरम्यान, आठवडाभरापूर्वी पडलेल्या भानुशाली इमारतीतील रहिवाशांची अद्यापही पुनर्वसन झालेले नसून या इमारतीतील रहिवाशांना कफ परेड येथेच पुनर्वसन हवे आहे, तर सरकार त्यांना चारकोप गोराई येथे घरे देत असून त्यांनी ती नाकारली असल्याचे समजते.

धनराज मेंशन इमारत

हेही वाचा –

निवडणूक आयोगाने भाजपशी संबंधित कंपनीला काम दिल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -