घरताज्या घडामोडीमाजी शिक्षक आमदार जे. यु. ठाकरे यांचे निधन

माजी शिक्षक आमदार जे. यु. ठाकरे यांचे निधन

Subscribe

नाशिक शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार जयवंत ठाकरे (वय ७४) यांचे मंगळवारी (दि.२८) सकाळी ११ वाजेला कोरोनामुळे निधन झाले. त्यांना जे. यु. नाना या नावाने ओळखले जात होते. गेल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे नाशिकमधील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालावली. ते मूळचे धुळे जिल्ह्यातील साक्री येथील रहिवाशी होते.

१९९४ ते २००० या काळात ते नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते. राष्ट्र सेवा दल, समाजवादी अध्यापक सभा, शिक्षक लोकशाही आघाडीमध्ये नाना सक्रीय होते. समाजवादी चळवळीतील आघाडीचे नेते असणारे जे. यु. ठाकरे हे गुण ग्राहक होते. संयमित भाषा, संघटन कौशल्य, वैचारिक सुस्पष्टता या जोरावर त्यांनी पुरोगामी चळवळ पुढे नेली. शिक्षक लोकशाही आघाडीचे ते नेते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -