घरताज्या घडामोडीदिलासादायक! मुंबईकरांची तहान भागवणारा 'तुळसी' तलाव ओव्हरफ्लो!

दिलासादायक! मुंबईकरांची तहान भागवणारा ‘तुळसी’ तलाव ओव्हरफ्लो!

Subscribe

मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ मंगळवारी २७ जुलै २०२० रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ८०४६ दशलक्ष लीटर पाण्याची क्षमता असणारा हा तलाव मागील वर्षी अर्थात १२ जुलै, २०१९ रोजी ओसंडून वाहू लागला होता. त्यामुळे यंदा हा तलाव भरण्यास विलंब झाला असला तरी हा तलाव भरून एकप्रकारे तलाव भरण्याचा श्री गणेशा झाला आहे.

मुंबईला भातसा, मध्य वैतरणा, तानसा, विहार, मोडक सागर, तुळसी आदी तलावांमधून दरदिवशी ३८०० दशलक्ष अर्थात ३८० कोटी लिटर एवढा पाण्याचा पुरवठा होतो. भातसा तलावातून सर्वाधिक पाणी पुरवठा होतो. तर तुळशी  आणि विहार या दोन तलावांमधून सर्वात कमी पाण्याचा पुरवठा होतो.मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते. मात्र, विहार तलाव भरण्यास अजून बराच अवकाश असल्याचे जलाभियंता विभागाचे म्हणणे आहे

- Advertisement -

मागील वर्षी अर्थात १२ जुलै, २०१९ रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०१८ मध्‍ये दिनांक ९ जुलै रोजी, वर्ष २०१७ मध्‍ये दिनांक १४ ऑगस्‍ट रोजी आणि वर्ष २०१६ मध्‍ये १९ जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.


हे ही वाचा – कोरोनाच्या नावाखाली जमा केलेल्या निधीवर मौजमजा, त्याने खरेदी केली लॅम्बोर्गिनी आणि..


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -