घरदेश-विदेशरामजन्मभूमीच्या पुजाऱ्यासह १६ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग

रामजन्मभूमीच्या पुजाऱ्यासह १६ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग

Subscribe

रामजन्मभूमीच्या सुरक्षेत गुंतलेले १६ पोलिसही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशातील अयोध्या येथून चिंताजनक बातमी समोर येत आहे. येथे राममंदिराच्या भूमीपूजनाच्या तयारी दरम्यान कोरोनाने शिरकाव केला आहे. याठिकाणी राम जन्मभूमीच्या पुजाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. तर रामजन्मभूमीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. न्यूज १८ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार रामजन्मभूमीचे पुजारी प्रदीप दास हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुख्य याजक आचार्य सत्येंद्र दास यांचे ते शिष्य असल्याचे सांगितले जात आहे.

१६ पोलिसही पॉझिटिव्ह

मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप दास हे सत्येंद्र दास यांच्यासह रामजन्मभूमीचे पूजन करतात. राम जन्मभूमीतील मुख्य पुजाऱ्यासह मुख्य पुजारी रामाची पूजा-अर्चना करतात. पुजारी प्रदीप दास यांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्यांना होम क्‍वारंटाइन करण्यात आले आहे. यासह रामजन्मभूमीच्या सुरक्षेत गुंतलेले १६ पोलिसही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींचा अयोध्या दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५ ऑगस्टला अयोध्येत दाखल होणार आहेत. पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत, तर यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशातील सर्व मान्यवरही उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्ट या भूमिपूजन कार्यक्रमाचा सोहळा जरी भव्यतेत होणार असला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -