घरक्रीडाजनतेनं चीनी माल नाकारला; BCCI ने IPL साठी चीनी स्पॉन्सर स्वीकारला

जनतेनं चीनी माल नाकारला; BCCI ने IPL साठी चीनी स्पॉन्सर स्वीकारला

Subscribe

किक्रेटची जत्रा म्हणून परिचित असलेल्या आयपीएलचा यावर्षीचा हंगाम सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. मात्र यावेळी IPL च्या विरोधात लोकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. IPL वर बहिष्कार घालावा, अशीही मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वदेशी जागरण मंचने चीनचे स्पॉन्सर कायम ठेवल्याबद्दल IPL वर बहिष्कार घालावा, अशी मागणी केली असून त्यांच्या मागणीला सोशल मीडियावर प्रतिसादही मिळत आहे.

लडाख मधील भारत-चीन सीमेवर दोन्ही देशात तणाव निर्माण झाल्यानंतर जो हिंसाचार झाला होता, त्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशभरातून चीनविरोधात एक संतापाची लाट पसरली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यानंतर ५९ चिनी मोबाईल Apps वर बंदी घातली होती. त्यालाही जनतेने चांगला पाठिंबा दिला. तरिही IPL सारख्या मोठ्या स्पर्धेत चिनी मोबाईल कंपनीला स्पॉन्सर म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे संघाच्या स्वदेशी जागरण मंचने आश्चर्य व्यक्त केले आहे.

- Advertisement -

आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलचा हा निर्णय भारतीय सैनिकांचा अपमान करणारा असल्याची टीका करण्यात येत आहे. भारताने चीनची आर्थिक नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सणांमधूनही चीनी वस्तूंना हद्दपार करण्यात आले. तसेच रस्ते आणि इतर मोठ्या कामांसाठी चीनसोबत जे करार करण्यात आले होते, ते करारदेखील राज्य आणि केंद्र सरकारने रद्द केलेल आहेत. तरिही आयपीएल चीनच्या कंपनीची स्पॉन्सरशिप कशी काय कायम ठेवते? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

चीनची मोबाईल कंपनी Vivo ही आयपीएलची मुख्य स्पॉन्सर कंपनी आहे. Vivo आयपीएलला वर्षाचे ४४० कोटी रुपये देते. पाच वर्षांचा हा करार असून २०२२ साली तो संपणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पॉन्सरशिप मिळत असल्यामुळे आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत व्हिवोला कायम ठेवण्याचा निर्णय झाला. मात्र सोशल मीडियावर यावर नाराजी व्यक्त आहे. जर आपण ही स्पॉन्सरशिप कायम ठेवली तर चीन आपल्यावर हसेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -