घरताज्या घडामोडीसुशांतचा रुग्णवाहिकेत गळा आवळून खून? चाहत्यांचा आरोप

सुशांतचा रुग्णवाहिकेत गळा आवळून खून? चाहत्यांचा आरोप

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा रुग्णवाहिकेतच गळा आवळून खून केलाचा आरोप चाहत्यांकडून केला जात आहे.

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणाला दररोज नवे वळण मिळत आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी गुंता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रोज या प्रकरणी नवीन माहिती समोर येत आहे. त्यातच आता सुशांतचे मृतदेह घेऊन जाणारा रुग्णवाहिका चालक चर्चेत आला आहे. ‘सुशांतचा रुग्णवाहिकेत गळा आवळून खून?’ केलाचा आरोप चाहत्यांनी केला आहे. तसेच सुशांतचे चाहते त्याला धमकीचे फोन करत असल्याचे ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे.

सुशांतने आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला होता. ही रुग्णवाहिका विशाल बंदगार चालवत होते. परंतु, रुग्णवाहिकेमध्येच सुशांतचा गळा आवळून खून केल्याचे काही चाहत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या काही चाहते विशाल बंदगारला सतत फोन करुन धमकी देत आहेत. तसेच त्यांच्याशी अर्वाच्च भाषेत बोलत देखील आहेत, असे देखील विशालने सांगितले आहे.

- Advertisement -

दरम्यान, विशाल यांचा चार रुग्णवाहिका असून त्यावर लिहिण्यात आलेल्या फोन नंबरवर देशातील विविध भागातून धमकीचे फोन येत आहेत. त्यामुळे अखेर विशाल यांनी पोलीस तक्रार करण्याचा विचार करत आहेत.

‘मी आणि माझा भाऊ शहरातील अनेक रुग्णालयात रुग्णवाहिका चालक म्हणून काम करतो. परंतु, मी सुशांतचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घेऊन गेलो, त्या दिवसापासून मला एक महिना झाला, सतत धमकीचे फोन येत आहेत. बऱ्याच वेळा हे चाहते अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात. तसेच रुग्णालयात नेतांना सुशांत जीवंत होता. मात्र, रुग्णवाहिकेत त्याचा गळा आवळा गेला. त्यामुळे तुम्हाला त्याची शिक्षा मिळेल’, असेही चाहते म्हणतात.

- Advertisement -

हेही वाचा – सुशांत प्रकरण सीबीआयकडे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -