घरमनोरंजनराजकुमार रावबरोबर नोरा फतेहीचं 'कमरिया'

राजकुमार रावबरोबर नोरा फतेहीचं ‘कमरिया’

Subscribe

चित्रपटसृष्टीला 'दिलबर' बनविणाऱ्या नोरा फतेहीचं नवं 'कमरिया' गाणं प्रदर्शित झालं आहे. यामध्ये राजकुमार रावबरोबर नोरा फतेहीनं आपल्या अदा दाखवल्या आहेत.

अवघ्या चित्रपटसृष्टीला ‘दिलबर’ बनविणाऱ्या नोरा फतेहीचं नवं गाणं आज प्रदर्शित झालं आहे. राजकुमार रावच्या ‘स्त्री’ चित्रपटात ‘कमरिया’ हलवताना आता नोरा फतेही दिसणार आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या आगामी ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटामध्ये नोरा फतेही ‘कमरिया’ गाण्यावर थिरकाताना दिसत आहे. राजकुमार राव, अपारशक्ती खुराणा आणि अन्य कलाकार या गाण्यामध्ये मजा मस्ती करताना दिसत आहेत. अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटाचं संगीत सचिन – जिगरनं दिलं आहे. नोरा फतेही ही बॅले डान्सर असून सध्या बॉलीवूडमध्ये तिचे जास्त चाहते असल्याचं दिसून येत आहे.

- Advertisement -

राजकुमारनं जास्त मेहनत घेतली

या गाण्यामध्ये नोराबरोबर काम करून आपल्याला खूप मजा आल्याचं राजकुमार रावनं सांगितलं. तर, नोरा एक उत्कृष्ट नृत्यांगना असून तिच्याबरोबर डान्स करणं अतिशय कठीण असल्याचंही राजकुमार रावनं मान्य केलं. त्यामुळं तिच्याबरोबर नृत्य करण्यासाठी आपण स्वतःच जास्त मेहनत केली, असंही त्यानं स्पष्ट केलं. तर नृत्यदिग्दर्शिक विजय गांगुलीचं कौतुक करायलादेखील यावेळी राजकुमार विसरला नाही. ‘स्त्री’ चित्रपट ३१ ऑगस्ट, २०१८ रोजी प्रदर्शित होत असून राजकुमार रावबरोबर या चित्रपटात श्रद्धा कपूर दिसणार आहे.

श्रद्धा आणि राजकुमार सध्या व्यस्त

‘स्त्री’ व्यतिरिक्त श्रद्धा सध्या सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये काम करत आहे. तर, शाहिद कपूरबरोबर ‘बत्ती गुल मीटर चालू’च्या चित्रीकरणातही ती सध्या व्यस्त आहे. याशिवाय ‘बाहुबली’ स्टार प्रभासबरोबर ‘साहो’ चित्रपटातही श्रद्धा दिसणार आहे. तर राजकुमार राव ‘फन्ने खाँ’, ‘मेंटल है क्या’ आणि ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -