घरताज्या घडामोडीगॅसच्या भडक्यात महिलेचा मृत्यू

गॅसच्या भडक्यात महिलेचा मृत्यू

Subscribe

राहत्या घरी गॅसचा भडका झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.१०) रात्री ९ वाजेदरम्यान हरदीप अपार्टमेंट, लोखंडे मळा, जेलरोड येथे घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तस्सीम गुलबाज शेख (३५, रा. हरदीप अपार्टमेंट, जेलरोड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्सीम गुलबाज शेख यांच्या राहत्या घरी गॅसचा भडका झाला. त्यात त्यांच्या अंगावरील कपड्याने पेट घेतल्या त्या गंभीर जखमी झाल्या. ही बाब कुटुंबियांना समजताच त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस हवालदार सोनवणे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -