घरकोरोना विघ्नहर्ता स्पर्धा'कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा'

‘कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा’

Subscribe

श्री गणरायाचा उत्सव म्हणजे आपल्या सर्वांसाठीच आनंदाचा सोहळा! मात्र यावर्षी कोरोनाचे विघ्न आले आणि सगळ्याच सण-उत्सवांवर काळजी-चिंतेचे ढग दाटले. गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणतो. विश्वावर जे कोरोना विषाणूचे विघ्न आले आहे. ते विघ्न बाप्पा दूर करेल, हा विश्वास प्रत्येक गणेशभक्तामध्ये आहे. यामुळेच यावर्षी आम्ही कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा घेऊन आलो आहोत. स्पर्धेचा गाभा असा आहे की, तुम्हाला गणपती बाप्पाच्या सजावटीमधून कोरोना बद्दलचा एखादा सकारात्मक संदेश देणारा देखावा दाखवायचा आहे. ही स्पर्धा केवळ घरगुती गणपतीसाठी आहे. शाडूची किंवा पर्यावरणपूरक मुर्ती घरात बसविणाऱ्यांनाच या स्पर्धेत सहभागी होता येईल. पीओपीची मुर्ती असणाऱ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला फक्त सजावटीचे फोटो, गणपतीच्या मुर्तीचा फोटो, गणपती किती दिवसांचा आहे, देखाव्यासाठी काय साहित्य वापरले आहे आणि गणेशोत्सव कधीपासून साजरा करता याची थोडक्यात माहिती पाठवायची आहे. आमचा व्हॉट्सअप क्रमांक 75066 50006 या नंबरवर तुम्ही फोटो आणि माहिती पाठवू शकता किंवा आम्हाला [email protected] या ईमेल आयडीवर देखील आपली माहिती पाठवू शकता. सोबत आपला नाव, पत्ता, संपर्क क्रमांक द्यायला विसरू नका.

- Advertisement -

या स्पर्धेसाठी येणाऱ्या अर्जाच्या छाननीतून विजेते ठरविले जाणार आहेत. गणेश चतुर्थी म्हणजे २२ ऑगस्ट ते अनंत चतुदर्शी (१ सप्टेंबर) पर्यंतच तुम्ही आम्हाला अर्ज पाठवू शकता. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थीला माय महानगर या आमच्या न्यूज पोर्टलवर विजेते जाहीर केले जातील.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्रता निकष?

– ही स्पर्धा फक्त घरगुती गणपतीसाठीच असेल.

- Advertisement -

– शाडूची किंवा पर्यावरणपूरक मूर्ती असलेल्यांनीच या स्पर्धेसाठी अर्ज करावा.

– पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरीस) च्या मूर्तींसाठीचे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

– गणपती बाप्पाच्या सजावटीमधून कोरोना बद्दलचा सकारात्मक संदेश देणारा देखावा असावा.

स्पर्धेत सहभागाची प्रक्रिया

– बाप्पांच्या मूर्तीचा फोटो

– सजावट आणि देखाव्याचा फोटो

– गणपती किती दिवसांचा आहे?

– सजावट / देखाव्यासाठी काय केले आहे?

– किती वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहात?

– तुमचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक आमच्या 75066 50006 या व्हॉट्सअॅप नंबरवर किंवा [email protected] आयडीवर ईमेल करावे.

– ईमेलवर अर्ज करताना Subject मध्ये – “कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा” आणि पुढे आपले नाव लिहावे

– गणेश चतुर्थी (२२ ऑगस्ट) ते अनंत चतुर्दशी (१ सप्टेंबर) पर्यंतच अर्ज पाठवू शकता

विजेता निवडीची प्रक्रिया

– आलेल्या सर्व अर्जांची आपलं महानगरचे अंतर्गत परिक्षक मंडळ छाननी करेल.

– येणाऱ्या अर्जांच्या संख्येनुसार बक्षिसांव्यतिरीक्त उत्तेजनार्थ बक्षिसे काढण्यात येतील.

– परिक्षक मंडळाचा निर्णय अंतिम राहिल.

– ५ सप्टेंबर २०२० रोजी संकष्टी चतुर्थीला विजेते आणि बक्षिसे जाहीर केले जातील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -