घरताज्या घडामोडीमुंबईसह राज्यात पुढील चार दिवस जोरदार पाऊस: समुद्रात ४.६७ मीटर उंच लाटा...

मुंबईसह राज्यात पुढील चार दिवस जोरदार पाऊस: समुद्रात ४.६७ मीटर उंच लाटा उसळणार!

Subscribe

मागील काही दिवसांपासून मुंबईसह काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाने गणेश भक्तांना देखील खरेदीची मुभा दिली नाही. मुंबईत पावसाची संततधार कायम असून आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. येणारे पुढील चार दिवस मुंबईसह राज्यातील इतर काही भागात पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. २५ ऑगस्टपर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार असून मुंबई प्रशासनाला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. गणपती आगमनाच्या एक दिवस आधीच मुंबईत पावसाने जोर धरला आहे. आज दुपारी २.१४ वाजता मुंबईत ४.६७ मीटर उंच भरती येण्याचा अंदाज आहे.

- Advertisement -

राज्यातील काही भागांना मागील काही दिवसात पावसाने झोपडले आहे. अक्षरश काही भागात पूरपरिस्थितीत निर्माण झाली. २५ ऑगस्टपर्यंत मुंबईसह राज्यातील इतर भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच प्रशासनाला सर्तक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

मुंबई गेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद दहिसर येथे झाली असून दहिसरमध्ये २०९ मिलीमीटर पाऊस कोसळला आहे. त्याचप्रमाणे कल्याण-डोबिंवलीत देखील पावसाचा जोर अधिक होता. उत्तर मुंबईत सुद्धा पावसाचा जास्त जोर दिसून आला. शुक्रवारी बाप्पाच्या आगमनाची तयार करण्यासाठी मुंबईतील अनेक ठिकाणी खरेदी साठी लगबग सुरू होती. पण पावसाने खरेदीची उसंत दिली नाही. त्यामुळे लाडक्या बाप्पासाठी मुंबईकरांना पावसातच खरेदी उरकावी लागली.


हेही वाचा – 

सरकारपेक्षा लोकांचा गणपतीवर विश्वास! खरेदीसाठी दादरमध्ये प्रचंड गर्दी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -