घरCORONA UPDATECorona : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण

Corona : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण

Subscribe

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. प्रमोद सावंत यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते घरीच आयसोलेटेड झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली असून त्यांनी म्हटले आहे की, मी माझी सर्व कामे घरातूनच करणार आहे. जे जे कोणी आपल्या संपर्कात आले असतील, त्या सर्वांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्लाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात गोवा हे पहिले कोरोनामुक्त राज्य बनले होते. याबाबत प्रमोद सावंत यांनी स्वतः माहिती दिली होती. मात्र काही काळानंतर पुन्हा गोव्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाचा कोरोना झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, देशात गेल्या २४ तासात ७८ हजारहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर १ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता बाधितांची संख्या ३७ लाखांवर गेली आहे. तर ६६ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आली आहे.

हेही वाचा –

यंदा ४२ हजार गणेश मूर्तींचे विसर्जन; मुंबई महापालिकेची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -