घरताज्या घडामोडीCorona पॉझिटिव्ह असतानाही कॉन्स्टेबलने बर्थडे पार्टीत ठेका धरला आणि नोकरी गमावून बसला

Corona पॉझिटिव्ह असतानाही कॉन्स्टेबलने बर्थडे पार्टीत ठेका धरला आणि नोकरी गमावून बसला

Subscribe

देशात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण दिवसागणिक वाढताना दिसत आहे. पण अशा परिस्थितीत देशातील काही लोक कोरोना संदर्भातले नियम पाळताना दिसत नाही आहेत. दरम्यान तेलंगणात कोरोना संदर्भातील नियम गांभीर्याने न घेतल्याचे अनेक घटना समोर आल्या आहेत. अशी काहीशी घटना पुन्हा एकदा हैराबादमध्ये उघकीस आली आहे. एका कोरोनाबाधित पोलिसाने पार्टीचे आयोजन केल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात पार्टी आणि गर्दीचे कार्यक्रम आयोजित करण्यासंबंधित सरकार आणि आरोग्य अधिकारी कडक सूचना देत आहेत. पण लोक नियमितपणे नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी एका रिसॉर्टमध्ये वाढदिवसाची पार्टी आयोजित केल्याचे समजताच किसरा भागातील कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्याला रचकोंडा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने निलंबित केले.

- Advertisement -

हैदराबादमधील पोलीस कर्मचाऱ्याने वाढदिवसाची पार्टी किसरा येथील रिसॉर्टमध्ये आयोजित केली होती. या पार्टीत इतर कर्मचारी आणि काही लोक उपस्थित होते. पार्टीच्या दोन दिवसांपूर्वी हा पोलीस कर्मचारी आजारी पडला होता आणि त्याच्यामध्ये कोरोना लक्षणे दिसू लागली होती. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. पण असे असूनही त्याने वाढदिवसाची पार्टी आयोजित केली. आता या पार्टीमध्ये हजर असलेल्या इतर लोकांचीही चाचणी करण्यात आली असून त्याचे अहवाल येणे बाकी आहे. रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

यापूर्वी जुलैमध्ये तेलंगणातील नामांकित ज्वेलरने दीडशे लोकांशी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीनंतर त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तसेच या पार्टीत हजर असलेल्या आणखी एका ज्वेलरचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यामुळे कोरोनाचे संकट अजून कायम असूनही तेलंगणातील अनेक लोक मार्गदर्शन सूचना गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

तेलंगणामध्ये आतापर्यंत १ लाख ६७ हजार ४६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत १ हजार १६ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ लाख ३५ हजार ३५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३० हजार ६७३ उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – राष्ट्रपतींनी हरसिमरत कौर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -