घरदेश-विदेशसर्वसामान्यांचे बजेट हलणार; हे पाच नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार

सर्वसामान्यांचे बजेट हलणार; हे पाच नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार

Subscribe

देश अनलॉकच्या दिशेने सुरू होत असताना येत्या १ ऑक्टोबरपासून सरकार काही नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहेत. बदललेल्या नियमांचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. यामध्ये ड्राइव्हिंग लायसन्स, आरोग्य विमा, फॉरेनला पैसे पाठवण्यावरील टीसीएस आदी महत्त्वपूर्ण गोष्टींचा समावेश असणार आहे. जाणून घेऊया यातील काही महत्त्वाच्या गोष्टी ज्याचा परिणाम तुमच्या बजेटवर होणार आहे.

  • प्रस्तावित बदलेल्या नियमानुसार मिठाई दुकानदाराला मिठाई वापरण्याची अंतिम तारीख सांगावी लागेल. किती दिवस ती मिठाई खाण्यायोग्य असेल, याची माहिती दुकानदाराने ग्राहकाला द्यायला हवी. FSSAI ने खाद्यपदार्थांच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • परदेशात पैसे पाठवण्यावर कर वसूल करण्याबाबत केंद्र सरकारने नवीन नियम बनवला आहे. परदेशात पैसे पाठवण्यावरील टीसीएसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम नियम १ तारखेपासून लागू होणार आहे.
  • हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये नवे बदल होणार असून यामध्ये कमी दरामध्ये अधिक आजार कव्हर केले जाणार आहेत. हे बदल आरोग्य विमा पॉलिसी प्रमाणित आणि ग्राहक केंद्रित करण्यासाठी केले जात आहेत.
  • गो एअरने १ तारखेपासून टर्निनल बदलण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत तुम्ही जर गो एअरच्या विमानाने प्रवास करणार असाल तर १ तारखेपासून दिल्लीवरून जाणाऱ्या किंवा येणाऱ्या सर्व देशांतर्गत उड्डाणे दिल्ली विमानतळावरून टर्मिनल नंबर २ वरून होणार आहे.
  • रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने मोटार वाहन नियम 1989 मध्ये केलेल्या सुधारणांविषयी नोटिफिकेशन काढलं आहे. ज्यामध्ये मोटार वाहन नियमांची अधिक चांगली देखरेख आणि अंमलबजावणी करण्यााठी १ तारखेपासून पोर्टलद्वारे वाहनांची कागदपत्रे आणि ई चलन ठेवता येणार आहे. नव्या नियमांनुसार ड्राइव्हिंग लायसन्स काढायला आता जास्त कागदपत्रांची गरज पडणार नाही.

हेही वाचा –

रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय घेणार – मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -