घरIPL 2020IPL 2020 : पूरनने जे आता केले, ते सॅमसनने आधीच केलेले, दोनदा!

IPL 2020 : पूरनने जे आता केले, ते सॅमसनने आधीच केलेले, दोनदा!

Subscribe

पंजाबच्या निकोलस पूरनने जे क्षेत्ररक्षण केले, ते कोणीही इतक्यातच विसरणार नाही. 

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब संघाला पराभव पत्करावा लागला. पंजाबने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २२३ धावांचा डोंगर उभारला. मात्र, राजस्थानने हे आव्हान ३ चेंडू आणि ४ विकेट राखून पूर्ण करत विक्रमी विजय मिळवला. संजू सॅमसन (८५), राहुल तेवातिया (५३) आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ (५०) यांनी चांगली फलंदाजी करत राजस्थानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे पंजाबला हा पराभव लवकर विसरायला नक्कीच आवडेल. मात्र, या सामन्यात पंजाबच्या निकोलस पूरनने जे क्षेत्ररक्षण केले, ते कोणीही इतक्यातच विसरणार नाही.

सॅमसनचेही उत्कृष्ट क्षेत्ररक्षण  

राजस्थान रॉयल्सचा संघ फलंदाजी करताना आठव्या षटकात संजू सॅमसनने मुरुगन अश्विनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारला. चेंडू सीमारेषेबाहेर जाणार असे वाटत असतानाच निकोलस पूरनने अप्रतिम सूर मारत तो षटकार अडवला. त्यामुळे सोशल मीडियावर पूरनचे खूप कौतुक झाले. ‘मी अशाप्रकारे चेंडू अडवलेला याआधी कधीही पाहिलेला नाही,’ असे भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर म्हणाला. मात्र, पूरनने जे आता केले, ते याआधीच त्याने ज्या फलंदाजाचा फटका अडवला, त्या संजू सॅमसनने केले होते. तेही दोनदा. सॅमसनने एकदा आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळताना, तर दुसऱ्यांदा भारताचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत चेंडू सीमारेषेबाहेर जाण्यापासून अडवला होता.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -