घरIPL 2020IPL 2020 : लोकेश राहुलवर दबाव टाकण्याचा मुंबईचे गोलंदाज प्रयत्न करतील!

IPL 2020 : लोकेश राहुलवर दबाव टाकण्याचा मुंबईचे गोलंदाज प्रयत्न करतील!

Subscribe

यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहुल (२२२) अव्वल स्थानी आहे.

आयपीएलमध्ये गुरुवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब असा सामना रंगणार आहे. या सामन्यात पंजाबचे सलामीवीर लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहुल (२२२) अव्वल, तर अगरवाल (२२१) दुसऱ्या स्थानावर आहे. या दोघांनीही एक शतक आणि एक अर्धशतक केले आहे. त्यामुळे त्यांना रोखणे मुंबईच्या गोलंदाजांना अवघड जाऊ शकेल. परंतु, आमचे गोलंदाज दोघांवर, त्यातही खासकरून कर्णधार राहुलवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील, असे मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉंडने सांगितले.

त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणे अवघड

राहुल सध्या फॉर्मात आहे. त्याने आमच्याविरुद्ध मागील काही सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. तो फारच उत्कृष्ट खेळाडू आहे. त्यामुळे त्याला रोखणे अवघड आहे. मात्र, आमच्या गोलंदाजांनी त्याच्याविरुद्ध कशी गोलंदाजी केली पाहिजे यावर एकत्र बसून चर्चा केली. राहुल मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात फटके मारू शकतो. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणे खूप अवघड आहे. मात्र, तो मधल्या काही षटकांमध्ये सावध फलंदाजी करतो हे आपल्याला माहित आहे. त्याचवेळी आम्हाला त्याच्यावर आणि पंजाबच्या इतर फलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्याला कसे बाद करायचे याबाबत आम्ही नक्कीच योजना आखू, असे बॉंडने सांगितले. तसेच पंजाबच्या फॉर्मात असलेल्या फलंदाजांना कमी धावांत रोखण्याची मुंबईच्या गोलंदाजांमध्ये क्षमता असल्याचेही बॉंड म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -