घरताज्या घडामोडीकाल आदित्य ठाकरे मुर्दाबाद, आज उद्धव ठाकरेंची स्तुती; अबु आझमींचा डॅमेज कंट्रोल

काल आदित्य ठाकरे मुर्दाबाद, आज उद्धव ठाकरेंची स्तुती; अबु आझमींचा डॅमेज कंट्रोल

Subscribe

महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी कालच मंत्रालयात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली होती. मानखुर्द येथील एस.एम.एस. ही कंपनी बंद करण्यासाठी अबु आझमी आक्रमक होत, आदित्य ठाकरे फोन घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र आज त्यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उडवत मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या पत्रकार अर्णब गोस्वामीवर सडकून टीका केली. काल आझमी यांनी आदित्य ठाकरेंवर केलेली टीका अनेकांना आवडली नव्हती. त्या टीकेची भरपाई आझमी यांनी आज उद्धव ठाकरेंची बाजू मांडून केली असल्याचे बोलले जात आहे.

हे वाचा – अबु आझमी यांची आदित्य ठाकरेंविरोधात मंत्रालयातच घोषणाबाजी

- Advertisement -

मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत समाजवादी पार्टीचे नेते अबू असीम आझमी यांनी काल बाबरी मशिदीच्या निकाला संदर्भातील आपली भूमिका मांडली. “सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे, त्याचा आम्ही निषेध करत आहोत. कालचा दिवस हा काळा दिवस म्हणून मुस्लिम बांधव पाळतील. बाबरी मशीद पाडण्यामागे माझ्या शिवसैनिकांचा हात असेल तर मला त्याचा गर्व आहे, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तर कार सेवकांनी आणि शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडण्यामागे हिंदूच असल्याचे अनेक पुरावे असतानाही जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाच्या विरोधात हा निकाल देऊन न्यायव्यवस्थेने मुस्लीम समाजात नाराजी निर्माण केली आहे.” असे अबू आझमी म्हणाले.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक पत्रकार अर्णब गोस्वामी हे ज्या प्रकारे ओरडून-ओरडून आणि आपल्या पत्रकारितेच्या मर्यादा ओलांडून टीका करत आहेत, हे पत्रकारितेला शोभणारे नाही असेही आझमी म्हणाले. “जर का बाळासाहेब जिवंत असते तर अशा प्रकारची टीका करण्याची अर्णब गोस्वामी सारख्या पत्रकाराची हिंमतच झाली नसती. जरी बाळासाहेब ठाकरे माझे विरोधक होते, तरीही मी त्यांच्या कार्य शैलीला सलाम करतो”, असे अबू आझमी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -