घरताज्या घडामोडीगाईच्या शेणाचा असाही फायदा; मोबाईल रेडिएशन कमी करत असल्याचा दावा

गाईच्या शेणाचा असाही फायदा; मोबाईल रेडिएशन कमी करत असल्याचा दावा

Subscribe

गाईच्या शेणापासून अँटी रेडिएशन चिप बनवल्याचा दावा कामधेनू आयोगाने केला आहे.

बऱ्याच जणांना गौमूत्र आणि शेण्याचे अनेक फायदे माहिती आहेत. तर अनेक रोगांवरचा इलाज म्हणून भारतामध्ये गोमूत्र आणि शेण वापरण्याचा उपाय देखील सुचवला जातो. पण, आता चक्क गायीच्या शेणापासून अँटी रेडिएशन चिप तयार करण्यात आली आहे. ही चिप मोबाईलसाठी वापरता येणार आहे. विशेष म्हणजे आजारांविरोझात ढाल असल्याचा दावा कामधेनू आयोगाने केला आहे.

- Advertisement -

शेणापासून अँटी रेडिएशन चिप बनवली

कामधेनू आयोगाने गायीच्या शेणापासून अँटी रेडिएशन चिप बनवल्याचा दावा केला आहे. ‘गायीचे शेण सगळ्यांना सुरक्षित ठेवेल. कारण गायीचे शेण हे रेडिएशन विरोधी असल्याचे वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेले आहे. त्यामुळे गायीच्या शेणापासून बनवलेली अँटी रेडिएशन चिप रेडिएशन कमी करण्यासाठी मोबाईलमध्येही वापरता येऊ शकते. विशेष म्हणजे आजारांविरोधात हे एक प्रकारे सुरक्षा कवच आहे,’ असा दावा कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कठीरिया यांनी केला आहे.

मोबाईलचे रेडिएशन कमी होण्यास मदत

कामधेनू आयोगाचे अध्यक्ष कथीरिया म्हणाले की, ‘गायीच्या शेणापासून रेडिएशन कमी करण्यास मदत होते. ही एक अँटी रेडिएशन चिप आहे. तसेच आम्हाला यातून असे दिसून आले आहे की, ही चिप मोबाईमध्ये ठेवल्यास रेडिएशन कमी होते. तुम्हाला जर आजारांपासून दूर राहायचे असेल तर याचा वापर करु शकता’, असे देखील ते पुढे म्हणाले. या अँटी रेडिएशन चिपचे नाव गौसत्व कवच, असे आहे. ही चिप राजकोटमधील श्रीजी गौशाळेत तयार करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -