घरदेश-विदेशLive Update: IPL 2020 मध्ये KKR vs SRH सामना सुपर ओव्हरमध्ये!

Live Update: IPL 2020 मध्ये KKR vs SRH सामना सुपर ओव्हरमध्ये!

Subscribe

IPL 2020 मध्ये KKR vs SRH सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असून दोन्ही टीमने २० ओव्हरमध्ये १६३ धावाच केल्या आहेत.


आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रुड ऑईलचे बदलते दर यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये सातत्याने बदल होत असतो. मात्र मागील १६ दिवसांपासून पेट्राल व डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये दरामध्ये घट होण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना असताना कोणताही बदल होत नसल्यान नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या राजधानी नवी दिल्लीमध्ये एका लिटरमागे पेट्रोलचा दर ८१.०६ रुपये आहे. तर डिझेलचा दर ७०.४६ रुपये आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

कोरोनाविरोधात लस येईपर्यंत मास्क हीच आपल्यासाठी लस- मुख्यमंत्री

कोरोना विरोधात लस येईपर्यंत मास्क हीच आपल्यासाठी लस ठरणार आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. करोनाविरोधातला लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही. यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता राखण्याची शपथ सर्वांनी घ्यावी असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील प्लाझ्मा थेरेपीसाठीच्या अफेरेसिस युनिटचे उद्घाटन ऑनलाइन प्रणालीने केले. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे

- Advertisement -

पुणे विभागातील 4 लाख 34 हजार 938 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 84 हजार 927 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 36 हजार 773 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 216 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.73 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 89. 69 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 13 हजार 645 रुग्णांपैकी 2 लाख 84 हजार 907 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 21 हजार 431 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 307 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.33 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 90.84 टक्के आहे.


हाथरस घटनेबद्दल काँग्रेस 26 ऑक्टोबरला देशव्यापी निषेध करणार


ब्राह्मोस सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय नौदलाने रविवारी ब्राह्मोस सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले. ही चाचणी चेन्नई येथील स्वदेशी बनावटीच्या स्टील्थ विध्वंसक आयएनएस चेन्नईवर करण्यात आली. चाचणीदरम्यान या क्षेपणास्त्राने अरबी समुद्रातील आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. ब्राह्मोसमुळे लांब अंतरावर असलेले लक्ष्य भेदण्याची क्षमता भारतीय नौदलाला प्राप्त झाली आहे. (सविस्तर वाचा)


कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमध्ये बंद ठेवण्यात आलेली मुंबईतील मेट्रो सेवा अखेर उद्या, सोमवारपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. ही मेट्रो सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे.


ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी स्टेम पाईप लाईनला गळती; लाखो लिटर पाणी वाया

ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणारी स्टेम प्राधिकरणाची १५३० मि. मि. व्यासाच्या पाईप लाईनला भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील तालुक्यातील पिंपळास गावाच्या हद्दीत चिर पडल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा फवारा उडून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. स्टेमचे ठाणे येथील जनरल मॅनेजर अनिल चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता ठाणे शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने त्यांचा ठाणे शहरातील पाणीपुरवठा बंद असल्याने ठाणे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यासाठी तूर्तास या गळती होणाऱ्या पाईपलाईनवरील पाणी पुरवठा बंद न करता दुपारपर्यंत दुरुस्ती सुरू केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.

स्टेम पाईप लाईन

नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी देशवासियांना खास संदेश दिला आहे. त्यांनी या सणाला आपण कोविड १९ ला पराभूत करण्याच्या आपल्या भूमिकेबद्दल सजग रहावे, ही मी तुम्हाला विनंती करतो. आपण लाखो कोरोना योद्ध्यांचा विचार केला पाहिजे, ज्यांनी आपला जीव गमावला आहे आणि जे आम्हाला वाचवण्यासाठी भयानक आजाराशी झुंज देत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.


चीनचा धक्कादायक दावा; थंड पदार्थांच्या पॅकिंगवर आढळले कोरोनाचे जीवंत विषाणू!

जगभरात कोरोनाचं थैमान सुरू असून देशात सध्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७५ लाखाच्या घरात पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत देशामध्ये ६१ हजार ८७१ नव्या रुग्णांची वाढ झाली असून १०३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर लस निर्मितीचं काम सुरू आहे. दरम्यान कोरोना संदर्भात नवीन माहिती समोर आली असून फ्रीजमध्ये थंड करण्यात आलेल्या पदार्थांच्या पॅकिंगवर कोरोनाचे जीवंत विषाणू आढळून आले आहे. हे निरीक्षण चीनमधील रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राने केले असून फ्रीजमध्ये थंड करण्यात आलेल्या पदार्थांच्या आवरणावर कोरोनाचे जीवंत विषाणू असल्याचा दावा केला आहे. (सविस्तर वाचा)


शेतकऱ्यांच्या मदतनिधीसाठी पंतप्रधानांची भेट घेणार; शरद पवार यांची उस्मानाबाद दौऱ्यावर माहिती

राज्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारपुढे मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून मदत मिळाली पाहीजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. यासंबंधी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे आज, रविवारी शरद पवार यांनी त्यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान म्हटल आहे. शरद पवार आज नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असून उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तुर येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. (सविस्तर वाचा)


बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपने प्रचाराची धुरा दिली आहे. दरम्यान, बिहारमध्ये प्रचारात दंग असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच मोदींच्या नावाचा जयघोष असल्याचे म्हटले आहे.


हैदराबादमध्ये अजूनही पावसाच्या सरी बरसत असून अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७५ लाखाच्या घरात पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत देशामध्ये ६१ हजार ८७१ नव्या रुग्णांची वाढ झाली असून १०३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात ७४ लाख ९४ हजार ५५२ इतके कोरोनाबाधित झाले असून त्यापैकी ७ लाख ८३ हजार ३११ इतके सक्रीय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ६५ लाख ९७ हजार २१० जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या १ लाख १४ हजार ०३१ इतकी आहे. (सविस्तर वाचा)


देशात १७ ऑक्टोबर २०२० रोजी पर्यंत एकूण ९ कोटी ४२ लाख २४ हजार १९० इतक्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल, शनिवारी ९ लाख ७० हजार १७३ इतक्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.


परतीच्या पावसानं मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार तडाखा दिला. अतिवृष्टीमुळं पिकांचं आतोनात नुकसान झालं. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मराठवाड्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वीच शरद पवार आपल्या बारामतीच्या गोविंद बाग या निवासस्थानावरुन हेलिकॉप्टरने तुळजापूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत.


मुंबई महानगरपालिका आणि प्राथमिक उर्दू शिक्षक संघाने इमामवाडा परिसरातील इयत्ता १ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मोबाईल फोन लायब्ररी सुरू केली आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थी, ज्यांना मोबाईल फोन परवडत नाही, ते आता ऑनलाइन वर्गात शिकत आहेत. आतापर्यंत २२ विद्यार्थी वर्गात सामील झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -