घरमहाराष्ट्रCorona Vaccine: देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'मन की बात' म्हणाले...

Corona Vaccine: देवेंद्र फडणवीसांनी सांगितली ‘मन की बात’ म्हणाले…

Subscribe

बिहारमधील मोफत लसीच्या घोषणेवरुन भाजपाला विरोधकांनी धारेवर धरले असून या मुद्द्यावरुन सर्वच राजकीय पक्ष भाजपावर निशाणा साधला आहे.

२८ ऑक्टोबर रोजी बिहार विधानसभेतील पहिल्या टप्प्यातील मतदान होत असून अवघ्या देशाचं लक्ष बिहारच्या निवडणूकांकडे लागलं आहे. भाजपकडून गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये आमची सत्ता आल्यास बिहारमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची मोफत लस देऊ, असे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनीही पत्रकार परिषदेत या वृत्ताला दुजोरा देत मतदारांना भाजपाला मत देण्याच आवाहन केलंय. भाजपाच्या या निर्णयावरुन भाजपावर टीका होत आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रालाही मोफत लस मिळालया हवी, अशी मन की बात सांगितली आहे.

बिहारमधील मोफत लसीच्या घोषणेवरुन भाजपाला विरोधकांनी धारेवर धरले असून या मुद्द्यावरुन सर्वच राजकीय पक्ष भाजपावर निशाणा साधताना दिसताय. तर बिहारमध्ये भाजपाची सत्ता आल्यास कोरोनाची लस मोफत देण्यात येणार…तर राज्यातील, इतर राज्यांचे काय, इतर राज्यांना मोफत लस देणे, केंद्र सरकारची जबाबदारी नाही , असा सवालही अनेकांनी या घोषणेनंतर उपस्थित केला आहे.

- Advertisement -

बिहारमध्ये मोफत लसीची घोषणा केल्यासंदर्भात बिहारचे निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, महाराष्ट्रालाही मोफत लस देणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

सामना अग्रलेखातून भाजपावर निशाणा

”बिहारमध्ये जे काय निकाल लागायचे ते लागतील, पण भाजपाने मोफत लसीच्या सुया टोचण्याचे ‘फुकट’ उद्योग सुरू केले आहेत.बिहारला ‘लस’ मिळावी याबाबत दुमत नाही, पण इतर राज्ये काही पाकिस्तानात नाहीत. कोरोना लसीचा मुद्दा भाजपाच्या बिहारी घोषणापत्रात यावा हे योग्य नाही. लसीचे वितरण सरकारची राष्ट्रीय भूमिका असायला हवी. ही एक प्रकारे भेदाभेदीच आहे. राष्ट्रीय एकात्मतेस नव्या लसीची गरज आहे,” अशा शब्दात शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधला आहे.


‘तुम मुझे वोट दो, हम तुम्हे वॅक्सीन देंगे’; भाजपाकडून देश विभागणीचा प्रयत्न? – राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -