घरIPL 2020सूर्यकुमार यादवला या देशाकडून खेळण्याची ऑफर

सूर्यकुमार यादवला या देशाकडून खेळण्याची ऑफर

Subscribe

RCB विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने दमदार फलंदाजी करत एकहाती मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. सूर्यकुमारने आरसीबीविरुद्ध शानदार ७९ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने त्याच्या खेळीने केवळ चाहत्यांची मने जिंकली नाहीत तर माजी परदेशी क्रिकेटपटूंची मने जिंकली आहेत. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. दरम्यान, सूर्यकुमार यादवची ऑस्ट्रलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आलेली नाही. यावरुन निवड समितीवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरीसचं एक ट्विट व्हायरल होत आहे.

सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचं असेल तर त्याने परदेशात जाऊन खेळावं. जसं न्यूझीलंडकरुन खेळू शकतो, असं ट्विट स्कॉट स्टायरीसने केलं आहे. जे खूप व्हायरल होत आहे. स्टायरिसच्या ट्विटवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलिया विरुद्ध आगामी टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे. आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फलंदाजाला राष्ट्रीय संघात संधी मिळत नाही याचा सर्वांना धक्क बसला आहे.

- Advertisement -

आयपीएलच्या तेराव्या मोसमात सूर्यकुमारने १२ सामन्यात ३६२ धावा केल्या आहेत. आतापर्यंत या मोसमात त्याने ३ अर्धशतके झळकावली आहेत. आयपीएलमध्ये सूर्यकुमारने आतापर्यंत ९७ सामने खेळले असून १९०६ धावा केल्या आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -