घरदेश-विदेशUS Election 2020: अधिकृत मतांची मोजणी केली तर मी सहज जिंकतोय; ट्रम्प...

US Election 2020: अधिकृत मतांची मोजणी केली तर मी सहज जिंकतोय; ट्रम्प यांचा दावा

Subscribe

संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरु आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. तर विद्यमान राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पिछाडीवर आहेत. गुरुवारपासून बायडेन २६४ मतांसोबत आघाडीवर असून त्यांना विजयासाठी केवळ ६ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे बायडेन यांचा विजय नक्की मानला जात आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. दरम्यान, मतमोजणी अजून सुरु असून ट्रम्प यांनी विजयाचा दावा करत अनधिकृत मतांच्या आधारे विजय चोरी केला जात असल्याचा आरोप केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेत जो बायडेन आणि डेमोक्रॅटिक पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. “जर तुम्ही अधिकृत मतांची मोजणी केलीत तर मी ही निवडणूक सहज जिंकतोय. पण जर तुम्ही अनधिकृत (मेल इन बॅलेट्स) मतेही मोजलीत तर ते बायडेन आणि डेमोकॅट्रिक पक्ष याद्वारे आमच्या हातातून विजय चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. मी अनेक राज्यांमध्ये ऐतिहासिक मतांनी विजय मिळवला आहे,” असे ट्रम्प पत्रकार परिषदेत म्हणाले. यावेळी ट्रम्प यांनी ओपिनिअन पोल्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे ओपिनिअन पोल्स खोटे असल्याचा दावा केला आहे.

- Advertisement -

ट्रम्प म्हणाले की, “ओपिनिअन पोल्समध्ये मुद्दामहून संपूर्ण देशात ब्ल्यू वेव्ह जी डेमोक्रॅटिक पक्षाच्या समर्थनार्थ दाखवण्यात आली आहे. अशी कोणतीच लाट देशात नव्हती. संपूर्ण देश रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने आहे.” ट्रम्प यांनी ओपिनिअन पोल्सवर बोलताना मेल इन बॅलेट्सवर देखील संशय व्यक्त केला. “मेल इन बॅलेट्स ज्या पद्धतीने फक्त एका बाजूचे दिसत आहेत त्यावरुन आश्चर्य वाटत आहे. ही एक भ्रष्ट प्रक्रिया आहे,” असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. पुढे बोलताना ट्रम्प यांनी निवडणूक जिंकू असा विश्वास व्यक्त केला. “ही निवडणूक आम्ही सहज जिंकू. पण यासाठी आम्हाला अनेकदा न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. आमच्याकडे पर्याप्त पुरावे असून याचा शेवट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात होईल,” असे ट्रम्प म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -