घरमहाराष्ट्रराज्य परिवहन विभागाचा प्रवाशांना दिलासा

राज्य परिवहन विभागाचा प्रवाशांना दिलासा

Subscribe

प्रवासी वाहतूक पूर्णपणे सुरू करण्यास संमती

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात थांबलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आता पूर्णांशी सुरू होण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारने प्रवासी बसेसमध्ये शंभर टक्के प्रवासी वाहतुकीला आज संमती दिली. यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आता रस्त्यावर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र प्रवासी बस सेवा बंद झाली होती. महाराष्ट्रातही मार्च महिन्यापासून ही सेवा थांबली होती. गेल्या दोन महिन्यांपासून ती काहीअंशी सुरू करण्यात आली होती. एका सीटवर एक प्रवासी या प्रमाणात बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, दुसरीकडे महामंडळाला प्रचंड तोटा उचलावा लागत होता.

- Advertisement -

दुसरीकडे संसर्गाची लागण काही प्रमाणात कमी झाल्याने आपल्या कामावर जाणार्‍यांची वर्दळ वाढू लागली असताना वाहतूक व्यवस्था अपुरी पडू लागली होती. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने प्रवासी वाहतूक आता शंभर टक्के या प्रमाणात सुरू करण्यास संमती दिली आहे. यावेळी राज्यातील उद्योग आता पुरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -