घरताज्या घडामोडीअन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची चौकशी सुरू

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची चौकशी सुरू

Subscribe

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण सध्या अधिक चर्चेत आलं आहे. याप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह इतर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अर्णब गोस्वामी यांना अलिबागहून आता तळोज तुरुंगात रवाना करण्यात आले आहे. त्यामुळे पुढेच काही दिवस अर्णब गोस्वामी यांचा मुक्काम तळोजा तुरुंगात असणार आहे. दरम्यान वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल करणारे तत्कालीन पोलीस अधिकारी सुरेश वराडे यांच्या चौकशीचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

अलिबागचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील तपासात बेजबाबदार आणि हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे गृह विभागाने खातेनिहाय चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. माहितीनुसार, सुरेश वराडे यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची देखील शक्यता आहे.

- Advertisement -

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी वराडे यांच्यासह अलिबागचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर आणि पोलीस उपअधीक्षक निघोची यांची देखील चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे सुरेश वराडे यांच्यासह अलिबागचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षक यांची चौकशी होणार असल्याचे समोर येत आहे.


हेही वाचा –  तुरुंगात अर्णब गोस्वामींची योग्य ती काळजी घेत आहोत; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -