घरमुंबईपरवान्याशिवाय भोजन बनवू नका, अन्यथा कठोर कारवाई करू

परवान्याशिवाय भोजन बनवू नका, अन्यथा कठोर कारवाई करू

Subscribe

स्वयंपाकघरासाठी आवश्यक असलेला परवाना घेतल्याशिवाय शाळेसाठी पाठवण्यात येणारे माध्यान्ह भोजन बनवू नये. अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सह्याद्री विद्या मंदिरसाठी माध्यान्ह भोजन पाठवणार्‍या लिंगेश्वर महिला बचत गटाला दिला आहे.

स्वयंपाकघरासाठी आवश्यक असलेला परवाना घेतल्याशिवाय शाळेसाठी पाठवण्यात येणारे माध्यान्ह भोजन बनवू नये. अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सह्याद्री विद्या मंदिरसाठी माध्यान्ह भोजन पाठवणार्‍या लिंगेश्वर महिला बचत गटाला दिला आहे. शुक्रवारी आणखी एका मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यामुळे डाळ-खिचडी खाल्ल्याने त्रास झालेल्यांची संख्या 19 झाली आहे. यातील दोन मुलांवर सध्या उपचार सुरू आहेत. एका मुलीला डेंग्यूची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

भांडुपमधील सह्याद्री विद्या मंदिर शाळेतील 16 विद्यार्थ्यांना बुधवारी डाळ-खिचडी खाल्ल्यानंतर अचानक पोटात दुखणे, उलट्या याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे या शाळेला माध्यान्ह भोजन देणार्‍या लिंगेश्वर महिला बचत गटाच्या स्वयंपाकघरावर एफडीएकडून कारवाई करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे परवाना नसल्याचे आढळून आले होते. स्वयंपाकघरासाठी आवश्यक परवाना तातडीने घ्यावा, तसेच तो घेतल्याशिवाय तेथे जेवण बनवण्यात येऊ नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा एफडीएचे (अन्न) सहआयुक्त शैलेश आढाव यांनी बचत गटातला दिला आहे.

- Advertisement -

गुरुवारी प्रथम 16 विद्यार्थी आणि मदतनीस, त्यानंतर आणखी एका मुलाला दाखल केले होते. शुक्रवारी आणखी एका मुलाला त्रास झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्रास झालेल्यांपैकी एक मुलगा व एका मुलीला वगळता सर्वांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. शुक्रवारी दाखल केलेला मुलगा आणि डेंग्यूची लागण झाल्याचा संशय असलेल्या मयुरी जाधव या मुलीवर उपचार सुरू आहेत.

मयुरी जाधव हिला दाखल करण्यापूर्वीच थोडासा ताप होता. तिच्या तपासणीनंतर तिला डेंग्यूची लागण असल्याचा संशय आला आहे. शुक्रवारी आणखी एक मुलाला त्रास झाल्याने त्याला दाखल केले आहे. या दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अन्य सर्वांना घरी सोडण्यात आले आहे.
– डॉ. उषा मोपरेकर, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, एम.टी. अगरवाल हॉस्पिटल.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -