घरCORONA UPDATEcoronavirus in Maharashtra: सलग पाचव्या दिवशी ५ हजाराहून अधिक रुग्णांचे निदान

coronavirus in Maharashtra: सलग पाचव्या दिवशी ५ हजाराहून अधिक रुग्णांचे निदान

Subscribe

आज राज्यात ५,७५३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,८०,२०८ झाली आहे. राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे. आज ४,०६० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १६,५१,०६४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.७५ टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण ८१,५१२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज नोंद झालेल्या एकूण ५० मृत्यूंपैकी ३० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे १४ मृत्यू हे पुणे – ७, नागपूर – ५, नांदेड – १ आणि यवतमाळ – १ असे आहेत. सध्या राज्यात ५,१५,९७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,६१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०२,१३,०२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,८०,२०८ (१७.४३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -