घरमहाराष्ट्रअनैसर्गिक सरकारं फार काळ चालत नाहीत - देवेंद्र फडणवीस

अनैसर्गिक सरकारं फार काळ चालत नाहीत – देवेंद्र फडणवीस

Subscribe

राज्यात महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं राज्य सरकारविरोधातली टीका सुरूच ठेवली आहे. त्यात आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. ‘आम्ही राज्यात विरोधात बसलो असलो, तरी सरकार पडण्याची वाट पाहत बसलेलो नाही. पण असं असलं, तरी अशी अनैसर्गिक सरकारं फार काळ चालत नाहीत. ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही राज्याला एक सक्षम सरकार देऊ हे नक्की’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘महाराष्ट्राला गुजरातपेक्षा वर नेलं’

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र गुजरातपेक्षा वर कसा होता, याचा दावा केला. ‘आमच्या सरकारच्या काळात गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राला आम्ही नंबर १ वर आणलं. आम्ही टीका केली म्हणजे आम्ही महाराष्ट्र द्रोही ठरत नाही. जनतेला सगळं काही समजतं. त्यांनी शिवसेना म्हणजे महाराष्ट्र असा गैरसमज करून घेऊ नये’, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

- Advertisement -

निष्क्रिय सरकारविरुद्ध जनतेमध्ये असंतोष!

‘निष्क्रिय सरकारविरुद्ध जनतेमध्ये मोठा रोष आहे. शेतकऱ्यांना कोणतीही मदत या सरकारने केलेली नाही. वीजबिलांचा देखील मोठा घोळ आहे’, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -