घरमहाराष्ट्रकंटेन्मेंट क्षेत्राबाहेर वॉटर स्पोर्ट्स, नौका विहारास परवानगी; राज्य सरकारचा निर्णय

कंटेन्मेंट क्षेत्राबाहेर वॉटर स्पोर्ट्स, नौका विहारास परवानगी; राज्य सरकारचा निर्णय

Subscribe

कन्टेमेंट झोन बाहेरील पर्यटन स्थळे पुन्हा सुरु करण्यासही राज्य सरकारकडून परवानगी

गेल्या ८ महिन्यांपासून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असताना राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र आता कोरोना संकटामुळे बंद असलेल्या अनेक सेवा सुविधा महाराष्ट्र मिशन बिगेन अगेनच्या अंतर्गत पुन्हा सुरु करण्यात आल्या. दरम्यान कन्टमेंट झोन बाहेरील वॉटर स्पोर्ट्स, नौका विहार, करमणूक उद्यानं आणि indoor entertainment activities सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर कन्टेमेंट झोन बाहेरील पर्यटन स्थळे पुन्हा सुरु करण्यासही राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील एक पत्रक राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसिद्ध केले आहे.

- Advertisement -

राज्यातील पर्यटन स्थळांना यापूर्वीच परवानगी देण्यात आली होती. मात्र आता कंटेन्मेंट क्षेत्राबाहेर जलक्रीडा, नौकाविहार आणि मनोरंजनाच्या इनडोअर कार्यक्रम घेण्यास मुभा दिली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांचा नियंत्रित येणारा आकडा पाहता कन्टेमेंटमधील नागरिकांची लॉकडाऊनच्या कडक नियमांतून सुटका करण्यात आली आहे. सोमवारी पर्यटन राज्यमंत्री आदित्य तटकरे यांनी गंगापूर धरणावर उभारलेल्या ग्रेप पार्क रिसोर्टची पाहणी केली, यावेळी त्यांनी बोटींगचे प्रथम तिकीट काढून या सर्व प्रथम बोटींग केली. यासह पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे मुंबईतून ऑनलाईन सहभागी झाले होते.

दरम्यान, ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे सांगितले जात आहे. या नव्या विषाणूचा संसर्ग राज्यात होऊ नये म्हणून राज्यातील पालिका हद्दीत ५ जानेवारी पर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. या काळात रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत घराबाहेर पडण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावधगिरी बाळगून चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

 

BSE चं नाव ‘मुंबई स्टॉक एक्सचेंज’ करा; बाळा नांदगावकरांची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -