घरमुंबईपाणी बिल थकबाकी वसुलीच्या अभय योजनेस ३ महिन्यांची मुदतवाढ

पाणी बिल थकबाकी वसुलीच्या अभय योजनेस ३ महिन्यांची मुदतवाढ

Subscribe

मुंबई महापालिकेने या योजनेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असताना आता त्यात तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नागरिकांना पाणीबिल थकबाकी ३१ मार्च २०२१ पर्यंत भरता येणार आहेत.

पाणीबिल थकबाकीचा भरणा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभय योजनेला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद लक्षात घेता. मुंबई महापालिकेने या योजनेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असताना आता त्यात तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नागरिकांना पाणीबिल थकबाकी ३१ मार्च २०२१ पर्यंत भरता येणार आहेत. नागरिकांनी पालिकेच्या या अभय योजनेअंतर्गत पाणीबिल थकबाकी भरणा लवकरात लवकर करून या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मुंबईत फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने आणि लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे कंपन्या, लहान – मोठे व्यवसाय बंद झाल्याने कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार गेला. त्याचा मोठा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर, करवसुलीवरही झाला आहे. त्यामुळे पालिकेची मालमत्ता कर, पाणीपट्टी देयके प्रलंबित आहेत. वास्तविक, नागरिकांनी त्यांच्या जल देयकांचा भरणा जलदेयकाच्या दिनांका पासून एका महिन्यात करणे बंधनकारक आहे. जर एका महिन्याच्या आत देयकाचे पैसे न भरल्यास त्यावर अतिरिक्त आकारणी केली जाते. तथापि, या अतिरिक्त आकाराबाबत जल जोडणीधारकांना विशेष सूट देण्‍यासाठी २०२० मध्ये पालिकेने ‘अभय योजना’ सुरु केली. ३१ डिसेंबर २०२० ही या योजनेची अंतिम तारीख होती. मात्र या योजनेला प्राप्त होत असलेला नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद लक्षात घेत, आता या योजनेला येत्या नवीन वर्षात ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी संबंधित नागरिकांनी शेवटच्या तारखेची वाट न बघता अभय योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या पाणीबिल थकबाकी भरणा लवकरात लवकर करावा, असे आवाहन पालिका जल अभियंता खात्यातर्फे करण्‍यात येत आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेद्वारे शहर व उपनगरे येथील सव्वा कोटींपेक्षा अधिक नागरिकांना दररोज सरासरी ३ हजार ८५० दशलक्ष लीटर (३८५ कोटी लीटर) पिण्याचा पुरवठा करण्यात येतो. देशातील सर्वात शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा मुंबई महापालिका करते. यासाठी नागरिकांद्वारे भरणा करण्यात येणा-या पाणी देयकांच्या रकमेचा सुयोग्यप्रकारे व नियोजनपूर्वक विनियोग करण्यात येतो. ही बाब लक्षात घेता, सुव्यस्थित पाणीपुरवठा नियमितपणे व्हावा, याकरिता नागरिकांनी त्यांच्या जल देयकांचे अधिदान हे जलदेयकाच्या दिनांका पासून एका महिन्यात अदा करणे बंधनकारक आहे. तसेच एका महिन्याच्या आत देयकाचे पैसे न भरल्यास त्यावर अतिरिक्त आकारणी केली जाते. देयकाच्या रकमेवर साधारणपणे दर महिन्याला २ टक्के यानुसार ही आकारणी केली जाते.


हेही वाचा – कॉंग्रेस कमकुवत असल्याचा अपप्रचार – बाळासाहेब थोरात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -