घरलाईफस्टाईलनवीन वर्षांत पाळा या निरोगी सवयी, वर्षभर रहा रोगांपासून मुक्त

नवीन वर्षांत पाळा या निरोगी सवयी, वर्षभर रहा रोगांपासून मुक्त

Subscribe

आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या त्यामुळे लोकांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला सुरूवात केली. वर्षांच्या सुरूवातील चांगल्या आणि हेल्दी लाइफ स्टाइलची सुरूवात करायला हवी.

कोरोना व्हायरच्या संक्रमाणामुळे २०२० हे वर्ष आव्हानांचे गेले. आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या त्यामुळे लोकांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला सुरूवात केली. वर्षांच्या सुरूवातील चांगल्या आणि हेल्दी लाइफ स्टाइलची सुरूवात करायला हवी. ज्यामुळे २०२१ हे संपूर्ण वर्ष अनेक रोगांपासून दूर राहण्यासाठी ताकद मिळेल.

फळे खा

- Advertisement -

दिवसाची सुरूवात ही फळे खाऊन करा. दिवसभरात कमीत कमी दोन प्रकाराची फळे खा. रात्री ९ वाजण्याच्या आधी करा. झोपण्यापूर्वी अर्धा तास शतपावली करा.

दिवसभराचा डाएट प्लॉन

- Advertisement -

ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरसाठी एक प्लॉन तयार करा. ब्रेक फास्ट आणि लंचला हेवी डाएट प्लॉन करा. मात्र रात्रीच्या जेवणात हलका आहार घ्या. डाएट प्लॉन करताना त्यात प्रोटीन, कॅल्शिअम आणि फायबर असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा.

योग्य पदार्थ खा


फ्रेश, सीजनल आणि घरी तयार केलेले पौष्टिक अन्न खा. प्रत्येक मोसमात येणाऱ्या भाज्या खा. घरी बनवलेल्या अन्नामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

निरोगी मन

शरिर निरोगी राहण्यासाठी आपले मनही निरोगी राहणे गरजेचे आहे. दररोज ६-८ घंटे पूरेशी झोप घ्या. ब्रेन फंक्शनमधून योग्य राहण्यासाठी आणि तणामुक्त राहण्यासाठी योग्य झोप अत्यंत गरजेची आहे. हेल्दी माइंड ठेवण्यासाठी पुस्तके वाचा,चांगली गाणी ऐका, मित्रमंडळींसोबत फिरण्याचा प्लॉन बनवा.

भरपूर पाणी प्या


भरपूर पाणी हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. मायो क्लिनिकच्या एका रिपोर्टनुसार, पुरूषांनी रोज ३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. तर महिलांनी दिवसभरात २ लिटर पाणी प्यायला हवे. त्यामुळे नवीन वर्षात भरपूर पाणी पिण्याची सवय लावून घ्या.

हात धुणे

आपल्या हातांना सर्वात जास्त किटाणू चिकटतात हेच किटाणू आपल्या शरिरात जातात. त्यामुळे नवीन वर्षात आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित हात स्वच्छ करा. बाहेर कोणत्याही गोष्टींना हात लावल्यानंतर त्वरित हात धुवा.

व्यायाम


योग्य आहारासोबतच योग्य व्यायाम करणेही अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कोणत्याही आजारापासून दूर राहण्यासाठी तसेच आजाराचा सामना करण्यासाठी आपले शरिर सदृढ असणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.


हेही वाचा – आहार भान – मटण/ कोंबडी वडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -