घरदेश-विदेशभयंकर! १७ वर्षाच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार; ४४ जणांविरोधात FIR

भयंकर! १७ वर्षाच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार; ४४ जणांविरोधात FIR

Subscribe

२०१६ पासून पीडितेसोबत दुष्कृत्यांना सुरुवात करण्यात आली असून ती १३ वर्षांची असताना तिच्यासोबत हा घृणास्पद प्रकार घडला

केरळमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेने संपूर्ण केरळ हादरलं आहे. वयवर्ष १७ असणाऱ्या मुलीसोबत वारंवार बलात्कार आणि लैंगिक छळ करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी तब्बल ४४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा भयंकर प्रकार केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील पलक्कड भागात घडला असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले.

- Advertisement -

२०१६ पासून पीडितेसोबत दुष्कृत्यांना सुरुवात

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि लैंगिक छळाप्रकरणी पोलिसांनी ४४ आरोपींविरोधात ३२ गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या २० आरोपींविरोधात लैंगिक छळ, बलात्कार आणि इतर गंभीर आरोप लावण्यात आले असून या सगळ्यांना अटक करण्यात आली आहे. तर २०१६ पासून पीडितेसोबत दुष्कृत्यांना सुरुवात करण्यात आली असून ती १३ वर्षांची असताना तिच्यासोबत हा घृणास्पद प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, एका वर्षानंतर तिच्यासोबत पुन्हा असाच प्रकार झाला. दुसऱ्या घटनेनंतर या मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते. बालसुधारगृहात एक वर्ष राहिल्यानंतर या मुलीला तिच्या आई आणि भावासोबत राहण्याची परवानगी मिळाली होती.

जवळपास वर्षभर पीडिता बेपत्ता

बालसुधारगृहातून बाहेर पडल्यानंतर जवळपास वर्षभर ही मुलगी बेपत्ता होती. डिसेंबर २०२० मध्ये या मुलीचा शोध लागला होता आणि तिथून तिला निर्भया केंद्रात आणण्यात आलं त्यानंतर तिचं समुपदेशन करून तिला धीर देण्यात आला अशी देखील माहिती मिळतेय. या प्रक्रियेत पीडितेला धीर देत असताना तिने हळूहळू तिच्यासह झालेल्या प्रकाराबाबत बोलायला सुरुवात केली होती. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, या पीडितेने दिलेल्या माहितीनुसार यातून तिने गेली काही वर्ष किती यातना, वेदना आणि भीतीदायक स्थितीमध्ये काढली होती याची पोलिसांना कल्पना आली. यामुळे पोलिसांनी अधिक वेळ न घालवता सगळ्या आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -