घरनवी मुंबईपनवेल राज्यस्तरीय 'अटल करंडक एकांकिका' स्पर्धा अंतिम टप्प्यात

पनवेल राज्यस्तरीय ‘अटल करंडक एकांकिका’ स्पर्धा अंतिम टप्प्यात

Subscribe

सातव्या राज्यस्तरीय ’अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीला शुक्रवार, २९ जानेवारीपासून पनवेलमध्ये सुरूवात होणार आहे.

रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या राज्यस्तरीय ’अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीला शुक्रवार, २९ जानेवारीपासून पनवेलमध्ये सुरूवात होणार आहे. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार्‍या या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन सकाळी ९ वाजता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. तर या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार रामशेठ ठाकूर हे असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नाटककार, साहित्यिक आणि ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून भाजपचे सांस्कृतिक सेलचे प्रदेक्षाध्यक्ष अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, अभिनेते संजय नार्वेकर, अभिनेते जयंत वाडकर, लेखक, दिग्दर्शक – अभिनेता अद्वैत दादरकर, अभिनेत्री ऋतुजा देशमुख, निर्मात्या कल्पना कोठारी, अभिनेते भरत सालवे, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते अभिजित झुंझारराव, कवी व अभिनेते राहुल वैद्य आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

महाअंतिम फेरीसाठी निवड झालेल्या २४ एकांकिका

दुसरा आईन्स्टाईन (सौ. नलिनी यशवंत दोडे विद्यालय, मुलुंड), विसर्जन (श्रुजन कलामंच, बोरीवली), यंदा कर्तव्य आहे (के. इ. एस कॉजेज, मुंबई), घरोट (नाट्यस्पर्श व भवन्स कॉलेज, मुंबई), वण्डरिंग बोट (एम. डी. कॉलेज, मुंबई), नातं (व्हाईट लाईट, ठाणे), स्टार (जिराफ थिएटर, मुंबई), १२ कि.मी. (ए.एस.एम. प्रोडक्शन, मुंबई), लव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशीप (आमचे आम्ही, पुणे), क्लिक (ओम साई कलामंच, वसई), आरपार (फोर्थ वॉल, ठाणे), पँडल (रिफ्लेशन थिएटर, पनवेल), लकडबगधा (दवेरथ थिएटर, डोंबिवली), आर ओके (सी. के. टी. कॉलेज, पनवेल), बारसं (कलांश थिएटर, रत्नागिरी), नंगी आवाज (कोकण ज्ञानपीठ, उरण), गुंतता (निर्मिती, वसई), भाद्रपद (कलारंग सामाजिक संस्था, अलिबाग), लॉटरी तिकीट (कला कारखाना, कांदिवली), शुद्धता गॅरेंटेड अर्थात पाणी (मॉर्निंग ड्रीम एंटरटेनमेंट, मुंबई), बेड टाईम (रूद्र प्रोडक्शन, इचलकरंजी), कुणीतरी पहिलं हवं (बी.एम.सी.सी., पुणे), बिनविरोध (रंगपंढरी, पुणे), जाळ्यातील खिळे (बोलपट, पुणे).

हेही वाचा –

शेतकरी आंदोलन: हिंसाचारप्रकरणी टीकैत, मेधा पाटकर यांच्यासह २६ शेतकरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -