घरताज्या घडामोडीLive Update: डोंबिवली MIDC त पुन्हा भीषण आग

Live Update: डोंबिवली MIDC त पुन्हा भीषण आग

Subscribe

डोंबिवली MIDC त पुन्हा भीषण आग लागली आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. फेज १ मधील कॅलक्सी कंपनीला आग लागली आहे.


क्रिकेटर सौरव गांगूली यांची तब्येत बिघडल्याने त्यांना पुन्हा कोलकत्याच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. अपोले रुग्णालयाने सौरव गांगुली यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. सौरव गांगुली यांची तपासणी करण्यात आली आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून त्यांच्या पॅरामीटर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. त्यांचे पॅरामीटर्स स्थिर आहेत, असे कोलकत्ताच्या अपोलो हॉस्पिटलकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -


 

- Advertisement -

 

भारतीय किसान युनियन (भानू) संघटनेने आंदोलनातून माघार घेतली आहे.


शेतकऱ्यांच्या आंदोलनातून व्हीएम सिंह यांचा गट अखेर बाहेर पडला आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनात मोठी फूट पडली आहे.


भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना पुन्हा एकदा छातीत दुखापत झाल्याने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


दिल्लीत हिंसाचारात ३०० पोलीस जखमी झाल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी सातत्याने अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.


दिल्ली हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचे समोर येत आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे तीन निवृत्त न्यायाधिशांमार्फत आयोग स्थापन करून याद्वारे चौकशी व्हावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.


देशात गेल्या २४ तासांत १२ हजार ६८९ नवे रुग्ण आढळले असून १३ हजार ३२० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच काल दिवसभरात १३७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.


आज सकाळी १० वाजता शेतकरी नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये कालच्या हिंसक आंदोलना संदर्भात चर्चा केली जाणार आहे.


अंबरनाथ-कर्जत दरम्यान वाहतूक विस्कळीत झाल्याचे समोर येत आहे. कर्जतच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद झाली आहे. खडी टाकणारी मशीन रुळावरून घसरली असल्यामुळे अंबरनाथ-कर्जतकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे


जगातील अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरण सुरू आहे. तरी देखील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांचा आकडा १० कोटी ८ लाख पार झाला आहे. यापैकी आतापर्यंत २१ लाख ६५ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून ७ कोटी २८ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -