घरताज्या घडामोडीगृहमंत्र्यांना नेटिझन म्हणतात, 'अहो गुगल ट्रान्सलेटर तरी बघा'

गृहमंत्र्यांना नेटिझन म्हणतात, ‘अहो गुगल ट्रान्सलेटर तरी बघा’

Subscribe

भाषांतरामुळे हा झाला घोळ

भाजपच्या अधिकृत वेबसाईट पेजवरील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पेजवरील स्क्रीनशॉटने एकच खळबळ माजली आहे. भाजपच्या या अधिकृत वेबसाईटवर रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नावाखाली आक्षेपार्ह उल्लेख केल्याचे उघडकीस आले. याचे स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या स्क्रीनशॉर्टची दखल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेऊन दोषींवर कारवाईचा इशारा दिला आहे. पण आता गृहमंत्र्यांना नेटिझन गुगल ट्रान्सलेटर पाहण्याचा सल्ला देत आहेत. कारण हा भाषांतराचा घोळ असल्याचे समोर आले आहे. यामुळे सध्या अनिल देशमुख यांच्या ट्विटला ‘जरा गुगल ट्रान्सलेटर बघा’, अशी नेटिझन प्रतिक्रिया येत आहेत.

नेमका काय आहे प्रकार?

रक्षा खडसे या रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या खासदार आहेत. गुगल ट्रान्सलेटरवर जेव्हा रावेर (Raver) हा शब्द इंग्रजीमध्ये टाकला जातो, तेव्हा त्याचे हिंदीमध्ये भाषांतर होमोसेक्सुअल असे येत आहे. त्यामुळे हा सगळा घोळ झाला आहे, असे नेटकरी म्हणत आहेत. आता या आक्षेपार्ह भाषांतर करणाऱ्यावर भाजप कारवाई करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अनिल देशमुख यांच्या ट्विटला नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया

- Advertisement -

- Advertisement -


हेही वाचा – मला बदनाम करण्यासाठीच हे कारस्थान – रक्षा खडसे


 

 

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -