घरमुंबईबाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेना फेरीवाल्यांकडून खंडणी उकळतेय; मनसेचा आरोप

बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेना फेरीवाल्यांकडून खंडणी उकळतेय; मनसेचा आरोप

Subscribe

फेरीवाल्यांकडून शिवसेना खंडणी वसूल करतेय, संदीप देशपांडेंकडून पुरावे सादर

शिवसेनेला विरप्पनची उपमा देणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत शिवसेना खंडणीखोर असल्याचा आरोप केला आहे. याबाबतचे पुरावे देखील संदीप देशपांडे यांनी सादर केले आहेत. फेरीवाल्यांकडून शिवसेना खंडणी वसूल करत त्यांना पावत्या देते, असा आरोप करत संदीप देशपांडे यांनी त्या पावत्या देखील सादर केल्या. शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटो पावतीवर छापून फेरीवाल्यांकडून खंडणी वसूल केली जात आहे, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. दरम्यान, याबाबत मुंबई पोलिसांना भेटून सविस्तर तक्रार देणार असल्याचं देखील देशपांडे यांनी सांगितलं.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. काही दिवसांपूर्वी संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनेला विरप्पन गँगची उपमा देत खंडणी वसून करत असल्याचा आरोप केला. दरम्यान, आज याबाबतचे पुरावे सादर केले. संदीप देशपांडे यांनी काही पावत्या सादर केल्या. या पावत्यांवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. तसंच सार्वजनिक पथ आणि पद वापर करणाऱ्या फेरीवाल्यांचा होणारा उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मुलनासाठी घेण्यात येणारा आकार, असं या पावतीवर लिहिण्यात आलं आहे.

- Advertisement -

MNS leader sandeep deshpande accuses Shiv Sena of extortion

या पावत्यांवरुन संदीप देशपांडे यांनी जोरदार टीका केली आहे. “आम्हाला पैसे द्या. पालिकेचे कर्मचारी तुमच्या स्टॉलला हात लावणार नाहीत. पोलिसांना आम्ही मॅनेज करु, असं शिवसेना फेरीवाल्यांना सांगतेय,” असा घणाघात संदीप देशपांडे यांनी केला आहे. मला सगळ्यात जास्त दु:ख याचं वाटतंय की या पावतीवर बाळासाहेबांचा फोटो आहे. या खंडणीखोरांना चाप बसला पाहिजे. महानगरपालिकेचे कर्मचारी या खंडणी प्रकरणात सामिल आहेत का? याची उच्चपदस्थ चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील संदीप देशपांडे यांनी केली आहे. या खंडणीखोरांच्या हातून मुंबई वाचवणम गरजेचं असून चंबळखोरांचं राज्य मुंबईत आलंय की काय? असा प्रश्न मला कधीकधी पडतो, असं संदीप देशपांडे म्हणाले.

- Advertisement -

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -