घरताज्या घडामोडीजम्मूत बस स्टॅडवर घातपाताचा कट उधळला, ६ किलोची स्फोटके केली जप्त

जम्मूत बस स्टॅडवर घातपाताचा कट उधळला, ६ किलोची स्फोटके केली जप्त

Subscribe

रविवारी जम्मूमध्ये पुन्हा एकदा घातपाताचा प्रयत्न करण्यात आला. जम्मूमधील बसस्थानकाजवळ रविवारी ७ किलोची स्फोटके जप्त करण्यात आली.

पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याला आज दोन वर्षे पूर्ण झालीत. पाकिस्तानला भारताने त्याच वेळी योग्य उत्तरही दिले. पाकिस्तानच्या कुरघोडींवर भारताने नेहमीच सडेतोड उत्तर दिले आहे.  मात्र पाकिस्तानच्या कुरघोड्या काही संपत नाही. रविवारी जम्मूमध्ये पुन्हा एकदा घातपाताचा प्रयत्न करण्यात आला. जम्मूमधील बसस्थानकाजवळ रविवारी ७ किलोची स्फोटके जप्त करण्यात आली. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्याच प्रकारचा हा मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट सुरु होता,असे सांगितले जात आहे. जम्मू येथे नेहमी गर्दी असलेल्या एका सामान्य बसस्थानकाजवळ हा घातपात करण्याचा कट रचला होता. मात्र भारतीय सैनिकांनी वेळीच हा कट उधळून लावला. जम्मू आणि सांबा जिल्ह्यातील बारी ब्राम्हण भागात पोलिसांनी दोन दहशतवाद्यांनाही अटक केली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेले आयईडीही पोलिसांनी जप्त केले आहेत.

- Advertisement -

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, आयईडी हे विशेष उपकरण वापरून दहशतवादी काम करताना आढळले आहे. पुलवामा हल्ल्याप्रमाणेच पुन्हा दोन वर्षांनी हा हल्ला करण्याचा कट केला जात होता. मात्र अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी हा कट उधळून लावला, असे पीटीआयने म्हटले आहे. त्याचबरोबर लष्कर ए मुस्तफाचा सेल्फ स्टाईल कमांडर हिदायतुल्लाह यालाही ६ फेब्रुवारीला जम्मू येथील कुंजवाणी भागातून पकडण्यात आले, असेही वृत्त पीटीआयने दिले.


हेही वाचा – पुलवामाचा हल्ला न विसरता येण्यासारखाच – पंतप्रधान

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -