घरमहाराष्ट्रअविनाश भोसले यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा, २४ फेब्रुवारी पर्यंत अटक नाही

अविनाश भोसले यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा, २४ फेब्रुवारी पर्यंत अटक नाही

Subscribe

ईडीच्या रडारवर असलेल्या अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायलयाने तुर्तास दिलासा दिला आहे. त्यामुळे २४ फेब्रुवारीच्या पुढील सुनावणीपर्यंत भोसलेंवर कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई न करण्याचे निर्देश ईडीला दिले आहेत. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) अंतर्गत आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणी अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित अंमलबजावणी संचालनालय (ईडी)च्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्सही बजावण्यात आला आहे.

विदेशी चलन प्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंची चौकशी ईडी करत आहे. याप्रकरणात ईडीने अविनाश भोसलेंना समन्स बजावत त्यांच्या ‘अबिल हाउस’ या कार्यालयावर छापे मारे केली. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी भोसलेंनी ईडीला चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करेन. परंतु ईडी कोणतीही माहिती न देता कार्यालयावर छापेमारी करत आहे त्याला रोखावे अशी मागणी भोसलेंनी खंडापीठासमोर केली. तसेच गुन्हा रद्द करण्यासाठी आणि समन्सच्या विरोधात शुक्रवारी याचिका दाखल केली होती. याचिकेवर न्यायालयाने अंतरिम निर्देश दिल्याने दोघांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. मात्र 17 तारखेला ED चौकशीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच आपला चौकशी अहवाल पुढील सुनावणीपर्यंत न्यायालयात सादर करण्याचे निर्देश ईडीला देत सुनावणी 24 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.

- Advertisement -

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अशी अविनाश भोसले यांची ओळख आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असलेल्या एबीआयएल ग्रुपचे मालक असलेले भोसले राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. बांधकाम क्षेत्रासंबंधीत असलेले शिवसेनाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईनंतर ईडीने अविनाश भोसले यांच्यावर कारवाई केली. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. २००७ मध्ये परदेशातून महागड्या वस्तू आणल्याने आणि परदेशी चलन बाळगल्याने ईडीने अविनाश भोसलेंवर कारवाई केली.

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -